Ishan Kishan IPL 2025 : सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 44 धावांनी पराभव केला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) विजयाचा हिरो होता तो म्हणजे इशान किशन(Ishan Kishan). इशान किशनने 47 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. या विकेटकीपर फलंदाजाने त्याच्या डावात 11 चौकार आणि 6 षटकार मारले. पण, सामन्यानंर सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. खरंतर, इशान किशनला सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली.
इशान किशन दुसऱ्या सामन्यातून बाहेर?
राजस्थान रॉयल्सच्या डावाच्या अठराव्या षटकात ही घटना घडली. त्यावेळी इशान किशन सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. यादरम्यान, दोन धावा वाचवण्याच्या नादात त्याला दुखापत झाली. यानंतर इशान किशन खुप वेदनेत दिसला. तसेच, दुखापत झाल्यानंतर तो पुन्हा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला नाही. इशान किशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पण, सनरायझर्स हैदराबाद संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांना आशा आहे की इशान किशनची दुखापत फार गंभीर नसेल.
सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला चारली पराभवाची धूळ
सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 6 गडी गमावून 286 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून इशान किशनने 47 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. याशिवाय, ट्रॅव्हिस हेडने 31 चेंडूत 67 धावांचे योगदान दिले.
सनरायझर्स हैदराबादच्या 286 धावांच्या प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 242 धावाच करू शकले. राजस्थान रॉयल्सकडून ध्रुव जुरेलने 35 चेंडूत सर्वाधिक 70 धावा केल्या. संजू सॅमसनने 37 चेंडूत 66 धावांचे योगदान दिले. तसेच, शिमरॉन हेटमायरने 23 चेंडूत 42 धावांची खेळी केली.
हे ही वाचा -