Harbhajan Singh On Jofra Archer: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 मध्ये समालोचन करताना माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) वादात सापडला आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील सामन्यादरम्यान हरभजन सिंगने जोफ्रा आर्चरवर (Jofra Archer) वादग्रस्त टिप्पणी केली. हरभजन सिंगने आर्चरसाठी 'काळी टॅक्सी' हा शब्द वापरला. हरभजन सिंगच्या या विधानानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर टीका करण्यात येत आहे. सदर प्रकारच्या कमेंटमुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे आणि हरभजन सिंगला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.


सदर घटना सामन्याच्या पहिल्या डावातील 18 व्या षटकात घडली, ज्यामध्ये राजस्थानकडून जोफ्रा आर्चर गोलंदाजी करण्यासाठी आला होता. सनरायझर्स हैदराबादकडून इशान किशन आणि हेनरिक क्लासेन क्रीजवर उपस्थित होते. जोफ्रा आर्चरच्या सलग चेंडूंवर क्लासेनने चौकार मारल्यानंतर हरभजनने ही टिप्पणी केली. सदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?, VIDEO


हरभजन सिंग म्हणाला, "लंडनमध्ये काळ्या टॅक्सीचे मीटर वेगाने चालते आणि इथे आर्चर साहेबांचे मीटरही वेगाने चालते." अशा प्रकारच्या टिप्पण्यांमुळे लोक संतप्त झाले आहेत आणि आयपीएल 2025 च्या समालोचन पॅनेलमधून हरभजन सिंगला तात्काळ काढून टाकण्याची मागणी होऊ लागली आहे. एका व्यक्तीने म्हटले की अशा टिप्पण्या लज्जास्पद आणि घृणास्पद आहेत. हरभजनला ताबडतोब कॉमेंट्री पॅनलमधून काढून टाकावे. 






जोफ्रा आर्चरने आयपीएलमधील सर्वात महागडा स्पेल टाकला-


आयपीएल 2025 च्या हंगामाची सुरुवात जोफ्रा आर्चरसाठी चांगली झाली नाही. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या संपूर्ण सामन्यात तो एकही विकेट घेऊ शकला नाही. जोफ्रा आर्चरने 4 षटकांत एकूण 76 धावा दिल्या. यासह, जोफ्रा आर्चर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज बनला आहे. यापूर्वी, हा विक्रम भारतीय गोलंदाज मोहित शर्माच्या नावावर होता, ज्याने 2024 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सकडून खेळताना 73 धावा दिल्या होत्या. दरम्यान राजस्थानविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने 44 धावांनी विजय मिळवला. 






संबंधित बातमी:


IPL 2025 Ishan Kishan SRH vs RR: तुम्हाला माझ्याकडून काय हवंय?; लिलावानंतर एक फोन कॉल अन् इशान किशनच्या आयुष्यात यूटर्न, शतक ठोकताच सर्व सांगितलं!


Vighnesh Puthur 2025: रिक्षा चालकाचा मुलगा, 30 लाख रुपयांची बोली; विघ्नेश पुथूरने किती कोटींच्या फलंदाजांना बाद केले?