Delhi Capitals vs Lucknow Super Giants IPL 2025: दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायट्स (Delhi Capitals vs Lucknow Super Giants) यांच्यात आज सामना खेळवण्यात येणार आहे. लखनौचे ऋषभ पंतकडे, तर दिल्लीचे अक्षय पटेलकडे नेतृत्व असणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात विशाखापट्टणम मैदानावर हा सामना खेळवला जाईल. 


खेळपट्टी कशी असेल?


विशाखापट्टणमची खेळपट्टी काळ्या मातीची बनलेली आहे. येथे फिरकीपटूंना जास्त मदत मिळते, ज्यामुळे फलंदाजांना खूप अडचणी येतात. सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल पण सामना जसजसा पुढे जाईल तसतसे त्यांच्यासाठी आव्हानही वाढत जाईल. विशाखापट्टणममध्ये नाणेफेक महत्त्वाची असेल...नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या मैदानावर धावांचा पाठलाग करणे सोपे होऊ शकते. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यादरम्यान विशाखापट्टणममधील हवामान चांगले असेल. सामन्यादरम्यान कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस राहील. सामन्यादरम्यान तापमान 28 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. पावसाची शक्यता नाही, आर्द्रता 72 टक्के असेल आणि ताशी 13 किलोमीटर वेगाने वारे वाहतील.


दिल्ली आणि लखनौमध्ये कोणाचा वरचष्मा आहे?


दिल्ली कॅपिटल्स लखनौपेक्षा मजबूत दिसत आहे. संघात चांगले सलामीवीर आहेत, मधली फळीही चांगली दिसते. कर्णधार अक्षर पटेल हा एक चांगला फिनिशर ठरू शकतो. गोलंदाजीतही दिल्लीचा वरचष्मा असल्याचे दिसते. दिल्ली कॅपिटल्सकडे सामना जिंकण्याची शक्यता जास्त आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये आतापर्यंत या स्टेडियममध्ये 15 सामने खेळले गेले आहेत. यापैकी, प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने 7 वेळा विजय मिळवला आहे तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 8 वेळा विजय मिळवला आहे. या स्टेडियममधील सर्वोच्च धावसंख्या 272 धावांची आहे, जी केकेआरने केली होती. पहिल्या डावात येथे सरासरी धावसंख्या 175 आहे.


दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य Playing XI-


जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, टी नटराजन.


लखनौ सुपर जायंट्स संभाव्य Playing XI-


अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), निकोलस पूरन, आयुष बदोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, राजवर्धन हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ.


लखनौ सुपर जायंट्सचा संपूर्ण संघ:


अर्शीन कुलकर्णी, मिशेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आरएस हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, आकाश दीप, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडेन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रीट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी.


दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ:


जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, मिशेल स्टार्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, टी नटराजन, करुण नायर, मोहित शर्मा, दुष्मंथ चामीरा, अजय जाधव मंडल, दर्शन नालकांडे, समीर रिझवी, डोनोवन फरेरा, त्रिपुराणा विजय, मनवंत कुमार एल, विप्रज निगम, माधव तिवारी.


संबंधित बातमी:


IPL 2025 Ishan Kishan SRH vs RR: तुम्हाला माझ्याकडून काय हवंय?; लिलावानंतर एक फोन कॉल अन् इशान किशनच्या आयुष्यात यूटर्न, शतक ठोकताच सर्व सांगितलं!


Vighnesh Puthur 2025: रिक्षा चालकाचा मुलगा, 30 लाख रुपयांची बोली; विघ्नेश पुथूरने किती कोटींच्या फलंदाजांना बाद केले?