IPL hattricks :  फलंदाजांचे वर्चस्व असणाऱ्या आयपीएल स्पर्धेत गोलंदाजांनीही आपला करिश्मा दाखवला आहे. आयपीएलच्या 16 वर्षात आतापर्यंत 22 वेळा हॅट्ट्रिक झाली आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत 14 वेळा भारतीय खेळाडूंनी हॅट्ट्रिक घेतली आहे. तर आठ वेळा विदेशी खेळाडूंनी हॅट्ट्रिक घेतली आहे. रोहित शर्मा, युवराज सिंह, अमित मिश्रा यांच्यासारख्या दिग्गजांनी आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेतली आहे. पण आयपीएलची पहिली हॅट्ट्रिक कुणी घेतली ? सर्वाधिक हॅट्ट्रिक कोणत्या गोलंदाजाच्या नावावर माहितेय ? यासारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात... 


प्रश्न : आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅट्ट्रिक कोणत्या गोलंदाजाच्या नावावर?
Q. Who has the most number of IPL hattricks?


आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅट्ट्रिक घेण्याचा विक्रम फिरकीपटू अमित मिश्रा याच्या नावावर आहे. अमित मिश्राने आयपीएलमध्ये आतापर्यंत तीन वेळा हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला आहे. 


प्रश्न : आयपीएलमध्ये पहिली हॅट्ट्रिक कुणी घेतली ?
Q. Who took the first hat-trick of the IPL?


आयपीएलची पहिली हॅट्ट्रिक चेन्नईच्या लक्ष्मीपती बालाजीच्या नावावर आहे. बालाजीने पहिल्याच हंगामात म्हणजे 2008 मध्ये पंजाबविरोधात हॅट्ट्रिक घेतली होती.


प्रश्न : कोणत्या संघाच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅट्ट्रिकची नोंद आहे?
Q. Which team has most hattrick in IPL?


आयपीएलमध्ये राजस्थान संघाच्या गोलंदाजांनी सर्वाधिक हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला आहे. राजस्थान संघाच्या नावावर पाच हॅट्ट्रिकची नोंद आहे. अजित चंडिला, प्रविण तांबे, शेन वॉटसन, श्रेयस गोपाल, युजवेंद्र चहल यांनी राजस्थानसाठी हॅट्ट्रिक घेतली आहे. 


प्रश्न : आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक कोणत्या गोलंदाजाने घेतल्या आहेत ?
Q. Which bowler has 3 hattrick in IPL?


अमित मिश्राने आयपीएलमध्ये तीन हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला आहे. 2008, 2011 आणि 2013 च्या हंगामात अमित मिश्राने हॅट्ट्रिक घेतली आहे.  


चेन्नईसाठी पहिली हॅट्ट्रिक कुणी घेतली ?
Q. Who is CSK first hat-trick?


चेन्नईसाठी लक्ष्मीपती बालाजीने पहिली हॅट्ट्रिक घेतली होती. त्याने 2008 मध्ये पहिल्याच हंगामात हा पराक्रम केला.  


आयपीएलमध्ये दोन वेळा हॅट्ट्रिक कुणी घेतली ?


युवराज सिंह यानं 2009 मध्ये दोन वेळा हॅट्ट्रिक घेतली. 


रोहित शर्मानं कुणाविरोधात हॅट्ट्रिक घेतली ? 


डेक्कन चार्जसमधून खेळताना रोहित शर्मानं आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. रोहित शर्मानं 2009 मध्ये मुंबईविरोधात हॅट्ट्रिक घेतली होती. रोहित शर्माने डेमियन मार्टिन, एस नरवाल, पी डोगरा या तिघांना बाद केले होते.    


 2023 आयपीएल हंगामात कुणी हॅट्ट्रिक घेतली ?
Q. Who took hat-trick 2023 IPL?


गुजरात टायटन्सचा फिरकीपटू राशीद खान याने 2023 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स विरोधात हॅट्ट्रिक घेतली होती. आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दूल ठाकूर यांना बाद करत राशीदने हॅट्ट्रिक नोंदवली होती. 2023 मधील ही एकमेव हॅट्ट्रिक होय. 


आणखी वाचा : 


Pakistani Cricketer in IPL:  आफ्रीदी,  अख्तर, मलिक... 'हे' 11 पाकिस्तानी क्रिकेटर्स खेळलेत IPL


IPL मध्ये 22 वेळा हॅट्ट्रिक! रोहितनं एकदा, युवीनं दोनदा केला करिश्मा; पाहा संपूर्ण यादी


कोहली-गंभीर, स्पॉट फिक्सिंग ते शाहरुख खान बॅन, IPL मधील मोठे वाद


IPL 2024 : आले किती गेले किती... IPL चे 10 रेकॉर्ड्स अबाधित, वाचून तुम्ही व्हाल चकीत!



IPL 2024: राजस्थान रॉयल्स दिसणार नव्या रुपात, आयपीएल 2024 साठी नवी जर्सी रिलीज


रहाणेसाठी टीम इंडियाची दारं कायमची बंद, रणजीमध्येही अजिंक्यचा फ्लॉप शो!


तामिळनाडूची शरणागती, मुंबई 48 व्यांदा रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये, लॉर्ड शार्दूल चमकला!


Ranji Trophy 2024 : 482 धावा, 22 विकेट... रणजी ट्रॉफीत धमाल; भारताला मिळाला 'नवा' अश्विन!


IPL 2024 : आयपीएल 2024 आधी हैदराबादचा मोठा डाव, विश्वविजेत्याला केले कर्णधार