Shreyas Iyer, Ranji Trophy 2024 : भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याला रणजी स्पर्धेतही (Ranji Trophy 2024) चमकदार कामगिरी करण्यात अपयश आले. खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून वगळल्यानंतर अय्यरनं  (Shreyas Iyer) देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला, पण त्याला अपय़श आले. उपांत्य सामन्यात तामिळनाडूविरोधात अय्यरला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. 


तामिळनाडूविरोधात श्रेयस अय्यर मोठी खेळी करेल, असा चाहत्यांना अंदाज होता. पण उपांत्य सामन्यात अय्यर फ्लॉप गेला. अय्यरला दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही, तो फक्त तीन धावा काढून तंबूत परतला. मागील 10 डावांत अय्यरला अर्धशतकही ठोकता आले नाही. इंग्लंडविरोधात पहिल्या दोन सामन्यात अय्यर फ्लॉप गेला होता, त्यामुळे कसोटी संघातून वगळण्यात आले होते. आता रणजीमध्ये तो फ्लॉप गेलाय. अजिंक्य रहाणेलाही रणजीमध्ये मोठी कामगिरी करता आला नाही.


 दहा डावात अर्धशतकही नाही - 


तामिळनाडूविरोधात श्रेयस अय्यर फक्त तीन धावा काढून बाद झाला. तो लागोपाठ दहा डावात फ्लॉप गेला आहे. अय्यरनं अखेरचं अर्धशतकं 17 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकाविरोधात वनडेमध्ये लगावलं होतं. त्यानंतर तो फ्लॉप गेलाय. दक्षिण आफ्रिकाविरोधात अय्यरने दोन कसोटीतील चार डावात अनुक्रमे 31, 6, 0, 4* धावा केल्या.  आंध्र प्रदेशविरोधात रणजी सामन्यात 48 धावांवर बाद झाला. इंग्लंडविरोधात मायदेशात चार डावात 35, 13, 27 आणि 29 धावा करता आल्या. मागील 10 डावात श्रेयस अय्यरला अर्धशतक ठोकता आलेले नाही.


श्रेयस अय्यरच्या निर्णायामुळे झाला वाद - 


भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळालं होतं. पण पहिल्या दोन्ही सामन्यात श्रेयस अय्यर सपशेल अपयशी ठरला. अय्यरला एकही अर्धशतक ठोकता आलं नाही. दोन कसोटीतील चार डावात अय्यर यानं  35, 13, 27 आणि 29 धावा केल्या होत्या. फ्लॉप कामगिरीनंतर अय्यरला ड्रॉप करण्यात आलं. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचा सल्ला बीसीसीआयकडून देण्यात आला होता.  


आंतरराष्ट्रीय संघातून वगळल्यानंतर श्रेयस अय्यरला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची सूचना बीसीसीआयकडून करण्यात आलेली. पण अय्यरनं दुखापतीचं कारण सांगत रणजी स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वाद निर्माण झाला. जो खेळाडू नॅशनल ड्यूटीवर नाही, त्या प्रत्येकाला रणजी सामन्यात खेळावं लागेल, असा फतवा बीसीसीआयनं काढला. याला श्रेयस अय्यर यानं तिलांजली दिली. त्यानंतर बीसीसीआयनं फटकारलं. त्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा यानेही आपल्या शैलीत त्यांचा समाचार घेतला. बीसीसीआय आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी फटकारल्यानंतर श्रेयस अय्यरनं यू टर्न घेतला. आता त्यानं रणजी स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. पण रणजी सामन्यातही अय्यरला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. 


आणखी वाचा :


रहाणेसाठी टीम इंडियाची दारं कायमची बंद, रणजीमध्येही अजिंक्यचा फ्लॉप शो!


तामिळनाडूची शरणागती, मुंबई 48 व्यांदा रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये, लॉर्ड शार्दूल चमकला!


Ranji Trophy 2024 : 482 धावा, 22 विकेट... रणजी ट्रॉफीत धमाल; भारताला मिळाला 'नवा' अश्विन!


IPL 2024 : आयपीएल 2024 आधी हैदराबादचा मोठा डाव, विश्वविजेत्याला केले कर्णधार