Ajinkya Rahane, Ranji Trophy :  अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याचं भारतीय संघातील (Team India) दरवाजे पूर्णपणे बंद झाल्याचं चित्र आहे. खराब फॉर्ममुळे संघाबाहेर असणाऱ्या अजिंक्य रहाणेला देशांतर्गत क्रिकेटमध्येही चमकदार कामगिरी करता आली नाही. रणजी स्पर्धेत शानदार (ranji trophy 2024) कामगिरी करुन रहाणे टीम इंडियात कमबॅक करेल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण आता या आशाही मावळल्या आहेत. रणजी स्पर्धेत अजिंक्य रहाणे सपशेल अपयशी ठरलाय. त्यामुळे टीम इंडियात कमबॅक होण्याची शक्यता आता धुसूर झाली आहे. 


अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने फायनलमध्ये धडक मारली. पण फलंदाजीमध्ये रहाणे अपयशी ठरलाय. 11 डावामध्ये अजिंक्य रहाणे याला फक्त एक वेळा 50 धावसंख्या पार करता आली. अजिंक्य रहाणेला 7 वेळा दुहेरी आकडाही ओलांडता आला नाही. अजिंक्य रहाणेला 11 डावात फक्त 134 धावा करता आल्यात. तीन वेळा त्याला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे अजिंक्य रहाणे याचं टीम इंडियातील कमबॅक नाहीच्या बरोबर झालं आहे. 


अजिंक्य रहाणेचा फ्लॉप शो - 


रणजी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातच अजिंक्य रहाणे गोल्डन डकचा शिकार ठरला. केरळविरोधातही त्याला खाते उघडता आले नाही. दुसऱ्या डावात 65 चेंडूत फक्त 16 धावा करता आल्या. उत्तर प्रदेशविरोधातही तो फ्लॉप गेला.  छत्तीसगढविरोधात अजिंक्य रहाणे यानं दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकलं. त्याआधी पहिल्या डावात तो फक्त एका धावेवर माघारी परतला. आसामविरोधात 22 धावा चोपल्या. बडोद्याविरोधात तीन धावा केल्या. तामिळनाडूविरोधात महत्वाच्या सामन्यातही तो फ्लॉप गेला. पहिल्या डावात त्याला फक्त एक धाव काढता आली. तर दुसऱ्या डावात फक्त 19 धावांचं योगदान दिलं. रणजी स्पर्धेत अजिंक्य रहाणे फ्लॉप गेलाय. 35 वर्षीय अजिंक्य रहाणे याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. दुसऱीकडे युवा फलंदाज भारतीय संघात शानदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे रहाणेचं टीम इंडियातील कमबॅक आता कठीण झालेय. 






अजिंक्य रहाणेचा आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड्स 
• 82 कसोट्या, 4931 धावा, 38.52 सरासरी 
• 90 वनडे, 2962 धावा, 35.26 सरासरी 
• 20 टी-20, 375 धावा, 20.83 सरासरी 


अजिंक्य रहाणेचं कमबॅक कठीणच... 
गेल्या अनेक दिवसांपासून अजिंक्य रहाणे आपल्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. गेल्या महिन्यात पार पडलेल्या रणजी ट्रॉफीतही अजिंक्य फारशी चांगली खेळू करू शकला नसून त्याची बॅट शांतच पाहायला मिळाली. दोन सामन्यांतील तीन डावांत रहाणेनं फक्त 16 धावा काढल्या. त्याला दोन वेळा खातंही उघडता आलं नाही. अशा परिस्थितीमध्ये अजिंक्य राहणेला संधी मिळण्याची शक्यता कमीच दिसतेय. अजिंक्य रहाणेनं जुलै 2023 मध्ये त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. तेव्हापासून आजपर्यंत रहाणे आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून लांबच राहिला. 


आणखी वाचा :


तामिळनाडूची शरणागती, मुंबई 48 व्यांदा रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये, लॉर्ड शार्दूल चमकला!


Ranji Trophy 2024 : 482 धावा, 22 विकेट... रणजी ट्रॉफीत धमाल; भारताला मिळाला 'नवा' अश्विन!


IPL 2024 : आयपीएल 2024 आधी हैदराबादचा मोठा डाव, विश्वविजेत्याला केले कर्णधार