Ranji Trophy 2023-24 Finalist : अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वातील मुंबईनं संघानं रणजी स्पर्धेच्या (Ranji Trophy 2024 ) अंतिम फेरीत धडक मारली. मुंबईने रेकॉर्डब्रेक 48 व्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहेत. उपांत्य फेरीत मुंबईने तामिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी धुव्वा उडवला. रणजी स्पर्धेत अंतिम फेरीत पोहचणारा मुंबईचा पहिला संघ ठरलाय. तनुष कोटियन (Tanush Kotian) आणि शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) यांची अष्टपैलू कामगिरी, तसेच डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीने दुसऱ्या डावात केलेल्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर मुंबईने उपांत्य फेरीत तमिळनाडूचा धुव्वा उडवला. अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईने सखळी फेरीत सात सामन्यापैकी पाच विजय मिळवले तर एक सामना गमावला, एक सामना बरोबरीत सुटला.
तामिळनाडूविरोधात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात 232 धावांची आघाडी घेतली होती. मुंबईने तामिळनाडूला पहिल्या डावात 146 धावांवर रोखलं होतं. त्यानंतर मुंबईने 378 धावांपर्यंत मजल मारली होती. मुंबईकडून शार्दूल ठाकूर यानं अष्टपैलू खेळी केली. दुसऱ्या डावातही तामिळनाडूच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. तामिळनाडूचा डाव 162 धावांत आटोपला. त्यामुळे मुंबईने हा सामना तीन दिवसांत एक डाव आणि 70 धावांनी जिंकला.
शार्दूल ठाकूर चमकला -
शार्दूल ठाकूर, तनिश कोटियन आणि शम्स मुलानी हे मुंबईच्या विजयाचे शिल्पकार ठरले. शार्दूल ठाकूर यानं मोक्याच्या क्षणी शतकी खेळी केली. त्याला तनिश यानं अर्धशतक ठोकत चांगली साथ दिली. पहिल्या डावात मुंबईचा संघ अडचणीत असताना शार्दूलने 105 चेंडूंत 109 धावांची महत्वाची खेळी केली. त्याला तनिश कोटियन यानं 89 धावां करत चांगली साथ दिली. तनिष याला तुषार देशपांडे यानं 26 धावा करत चांगली साथ दिली. त्यामुळेच मुंबईला पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली. शार्दूल ठाकूर यानं गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. शार्दूलनं दोन्ही डावात चार फलंदाजांना तंबूत पाठवलं. शार्दूल ठाकूर याला सामनावीर पुरस्कारनं गौरवण्यात आले.
रणजी स्पर्धेत मुंबईचा प्रवास -
अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईने आतापर्यंत शानदार प्रवास केलाय. बिहारला एक डाव आणि 51 धावांनी पराभूत करत मुंबईने दिमाखात सुरुवातकेली. त्यानंतर ग्रुप स्टेजमध्ये दुसऱ्या सामन्यात आंध्र प्रदेशचा दहा विकेटनं पाभव केला. तिसऱ्या सामन्यात केरळचा 232 धावांनी पराभव केला. उत्तर प्रदेशकडून दोन विकेटनं पराभवाचा सामना करावा लागला. पाचव्या सामन्यात बंगालला एक डाव आणि चार धावांनी पराभूत केले. छत्तीसगडविरोधातील सामना ड्रॉ राहिला. ग्रुप स्टेजमधील अखेरचा सामना मुंबईने जिंकला. आसामचा एक डाव आणि 80 धावांनी धुव्वा उडवला. उप उपांत्यपूर्व फेरीत मुंबई आणि बडोदा यांच्यातील सामना ड्रॉ सुटला, पण पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर मुंबईने उपांत्य फेरीत धडक मारली. त्यानंतर उपांत्य फेरीत मुंबईने तामिळनाडूचा धुव्वा उडवत फायनलचं तिकिट मिळवलं. मुंबईने रेकॉर्डब्रेक 48 व्यांदा फायनल गाठली आहे.
आणखी वाचा :
Ranji Trophy 2024 : 482 धावा, 22 विकेट... रणजी ट्रॉफीत धमाल; भारताला मिळाला 'नवा' अश्विन!
IPL 2024 : आयपीएल 2024 आधी हैदराबादचा मोठा डाव, विश्वविजेत्याला केले कर्णधार