दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्याच घरच्या मैदानावर बुधवारी रात्री 17 एप्रिलला झालेल्या एकतर्फी सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला. या सामन्यात दिल्लीने गुजरातला अवघ्या 90 धावांत गुंडाळले आणि सामना 6 गडी राखून जिंकला. मात्र, या सामन्यापेक्षा मैदानात सामना पाहायला आलेल्या एका मुलीचीच अधिक चर्चा होत आहे. गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामन्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी मैदानातील एका स्टँडवर बसलेली आहे जी अगदी स्टार स्पॅनिश अभिनेत्री ॲना डी आर्मस हिच्यासारखी दिसते. खरंच ही तीच अभिनेत्री आहे का? नाही, असे अजिबात नाही. 






ॲना डी आर्मस कोण आहे?


आना डी आर्मस ही क्यूबन आणि स्पॅनिश अभिनेत्री आहे. तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात क्युबन रोमँटिक फिल्म 'उना रोजा डी फ्रान्सिया'मध्ये मुख्य भूमिकेतून केली होती. वयाच्या 18 व्या वर्षी, ती माद्रिद, स्पेन येथे राहायला गेली आणि 2007 ते 2010 या सहा सीझनमध्ये 'एल इंटरनाडो' या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री म्हणून काम केले.


इंस्टाग्रामवर 10 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स-


ॲना डी आर्मसचे जगभरात फॅन फॉलोअर्स आहेत. त्यांचे चाहते सर्वत्र उपस्थित आहेत. सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, Instagram वर अभिनेत्रीचे 13.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. स्पॅनिश अभिनेत्री आणि मॉडेल ॲना खूपच सुंदर आहे. ती अनेकदा तिच्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.


शुभमन गिलची रिॲक्शन व्हायरल-


गुजरातचा कर्णधार शुभमन गिल या सामन्यात फक्त 8 धावा करू शकला. पण, या पराभवाची चर्चा सोडून शुभमनच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. सदर व्हिडीओत स्टेडियमवरील मोठ्या स्क्रीनवर जेव्हा मिस्ट्री गर्ल दिसते, तेव्हा डग आऊटमध्ये बसलेल्या शुभमन दिलेली रिॲक्शन व्हायरल होत आहे. सदर व्हिडीओबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र राहुल तेवातियासाठी जेव्हा डीआरएस घेतला गेला आणि त्यात तो बाद असल्याचे दिसले, तेव्हा शुभमनची ही रिॲक्शन होती, असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.


दिल्लीचा विजय-


लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. पृथ्वी शॉ आणि जॅक फ्रेझर-मॅकगर्क यांच्यात पहिल्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी झाली. स्पेन्सर जॉन्सनने संघाला पहिला धक्का दिला. त्यांनी मॅकगर्कची शिकार केली. त्याला दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 20 धावा करता आल्या. तर शॉ केवळ सात धावा करू शकला. या सामन्यात अभिषेक पोरेलने 15, शाई होपने 19, ऋषभ पंतने 16 आणि सुमित कुमारने 9 धावा केल्या. पंत आणि सुमित नाबाद राहिले. 


संबंधित बातम्या:


शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video


आयपीएलची नवीन मिस्ट्री गर्ल; शुभमन गिलही बघतच बसला, नेमकं प्रकरण काय? Video एकदा पाहाच!


पत्नीने निर्माण केलीय वेगळी ओळख; कसं आहे मुंबईच्या संघातील टीम डेव्हिडचं खासगी आयुष्य?