Mumbai Indians Rohit Sharma Hardik Pandya: मुंबई इंडियन्सने यंदाच्या सत्रातील आपला तिसरा विजय मिळवताना पंजाब किंग्सला 9 धावांनी पराभूत केले. पंजाबच्या आशुतोष शर्माने अर्थशतक झळकावत एक वेळ पंजाबच्या विजयाचे चित्र निर्माण केले; परंतु जसप्रीत बुमराह व गेराल्ड कोएत्झीने निर्णायक मारा करत मुंबईला विजयी केले.


मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 192 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवच्या दमदार अर्धशतकामुळे मुंबईला मोठी धावसंख्या गाठता आली. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. पंजाबच्या 14 धावांवर 4 विकेट्स गमावल्या होत्या. शशांक सिंग आणि आशुतोष शर्माने पंजाबसाठी चांगली खेळी केली. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात दोघांना अपयश आले.


मुंबईचा सामना असला की संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याचे मैदानावरील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. याचदरम्यान मुंबई आणि पंजाबविरुद्धच्या सामन्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार झाल्यापासून चाहत्यांकडून त्याला ट्रोलिंग केले जात आहे. संघातील खेळाडूही कर्णधार हार्दिकला साथ देत नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हे सांगायला भाग पडेल की मुंबईच्या खेळाडूंनाही हार्दिकला कर्णधार म्हणून आवडत नाही.


व्हायरल होत असलेला व्हिडीओ दुसऱ्या डावाचा म्हणजेच मुंबईच्या गोलंदाजीदरम्यानचा आहे, जेव्हा पंजाब किंग्सला शेवटच्या षटकांत विजयासाठी 12 धावांची गरज होती. या कालावधीत पंजाब किंग्सने 9 विकेट गमावल्या होत्या. मुंबईसाठी शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी आकाश माधवालला सोपवण्यात आली. पण षटक सुरू होण्यापूर्वी आकाश कर्णधार हार्दिक पांड्या आणि माजी कर्णधार रोहित शर्मासोबत उभा राहून बोलताना दिसत आहे.


व्हिडीओमध्ये नेमंक काय?


सदर व्हिडीओमध्ये आकाश माधवालचे लक्ष फक्त रोहित शर्माच्या बोलण्याकडे आहे. कर्णधार हार्दिक पांड्या पुढे काय बोलतो याकडे तो लक्ष देत नाही. एवढेच नाही तर संपूर्ण संभाषणात आकाश माधवालने हार्दिक पांड्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. म्हणजेच आकाशने कर्णधार हार्दिककडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. व्हिडीओ पाहून असे वाटत होते की, आकाश माधवाल षटक सुरू होण्याआधी क्षेत्ररक्षण लावण्याबाबत बोलत आहे. पण क्षेत्ररक्षण सेट करण्यासाठी गोलंदाज कर्णधाराशी बोलतात, पण इथे आकाश माधवालने पांड्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.






मुंबईचा विजय-


मुल्लानपूर येथे झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 192 धावा केल्या. संघासाठी सूर्यकुमार यादवने 53 चेंडूंत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 78 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जचा संघ 19.1 षटकांत 183 धावांवर सर्वबाद झाला.


संबंधित बातम्या:


आयपीएलची नवीन मिस्ट्री गर्ल; शुभमन गिलही बघतच बसला, नेमकं प्रकरण काय? Video एकदा पाहाच!


पत्नीने निर्माण केलीय वेगळी ओळख; कसं आहे मुंबईच्या संघातील टीम डेव्हिडचं खासगी आयुष्य?