चंदीगड : आयपीएलमध्ये (IPL 2024) काल झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) पंजाब किंग्जला (Punjab Kings) 9 धावांनी पराभूत केलं. मुंबईनं पहिल्यांदा फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीच्या जोरावर 7 बाद 192 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवशिवाय रोहित शर्मा, तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड यांनी केलेल्या चांगल्या फलंदाजीमुळं मुंबईनं 192 धावांचा टप्पा गाठला होता. पंजाब किंग्जचा संघ 192 धावांचा पाठलाग करताना 183 धावांपर्यंत मजल मारु शकला. पंजाबचा आणखी एका अटीतटीच्या लढतीत पराभव झाला. या मॅचमध्ये मुंबईची बॅटिंग सुरु असतानाचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. त्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची कथित चलाखी कैद झाली आहे. यामुळं डीआरएसवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. 


नेमकं काय घडलं?


मुंबईच्या डावाच्या 15 व्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंग बॉलिंग करत होता. यावेळी त्यानं सूर्यकुमार यादवला वाईड यॉर्कर टाकला होता. यावेळी अम्पायरनं तो बॉल वाईड दिला नव्हता. याचवेळी मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाऊचर, केरॉन पोलर्ड आणि टीम डेव्हिड यांनी रिप्ले पाहून सूर्यकुमार यादवला डीआरएससाठी इशारा केल्याचा दावा करण्यात आला आहे. डीआरएस घेण्यात आल्यानंर थर्ड अम्पायरनं तो बॉल वाईड दिला. यानंतर सॅम कर्रन संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. 


पाहा व्हिडिओ :






सॅम कर्रनच्या 19 व्या ओव्हरमध्ये देखील थर्ड अम्पायरच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. टीम डेव्हिड बॅटिंग करत असताना त्याला सॅम कर्रननं आऊटसाईड ऑफला टाकलेला बॉल अम्पायरनं वाईड दिला नव्हता. यानंतर टीम डेव्हिडनं डीआरएस घेतला. टीम डेव्हिडच्या बॅट खालून बॉल जाताना दिसत असून थर्ड अम्पायर असलेल्या नितीन मेनन यांनी मैदानावरील अम्पायरचा निर्णय बदलला. 


या प्रकरणासंदर्भात सनरायजर्स हैदराबादचा माजी हेड कोच टॉम मूडीनं मोठं वक्तव्य केलं आहे. आता वेळ आलीय आपल्याकडे स्पेशल थर्ड अम्पायर असायला हवेत. अनेक निर्णयांबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. थर्ड अम्पायरकडे अनुभव असायला  हवा असं देखील ते म्हणाले. 


दरम्यान, मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलमधील तिसरा विजय मिळवला असून त्यांचा पुढील सामना राजस्थान रॉयल्स सोबत होणार आहे. राजस्थान रॉयल्सनं मुंबईला वानखेडे स्टेडियमवर पराभूत केलं होतं. मुंबईपुढं राजस्थानचा त्याच्या होमग्राऊंडवर पराभव करण्याची संधी आहे. हार्दिक पांड्याच्या टीमला यामध्ये यश येत का ते आगामी काळात पाहायला मिळेल. 


संबंधित बातम्या :


 Hardik Pandya Fined : मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर हार्दिक पांड्यासाठी बॅड न्यूज, आयपीएलनं घेतला कठोर निर्णय, काय घडलं?


MI vs PBKS : अटीतटीच्या लढतीत मुंबईचा विजय, पंजाबनं नाकीनऊ आणलं, हार्दिक म्हणाला आम्हाला सुधारणेची ........