Watch Video: हैदराबाद आणि गुजरात यांच्यात मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर आयपीएलचा 21 सामना खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून हैदराबादच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या गुजरातच्या संघाची सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकात भुवनेश्वर कुमारनं 17 धावा दिल्या. मात्र, तिसऱ्या षटकात भुवनेश्वर कुमार यांनी संघाच्या तिसऱ्या आणि त्याच्या दुसऱ्या षटकात शुभमन गिलला झेल बाद करुन कमबॅक केलं. सध्या सोशल मीडियावर भुवनेश्वर कुमारच्या विकेट्स पेक्षा त्याच्या गोलंदाजीवर झेल पकडणाऱ्या राहुल त्रिपाठीची जोरदार चर्चा रंगली आहे. शुभमन गिलचा एका हातानं झेल घेतल्यानं तो चर्चेचा विषय ठरला आहे.


या सामन्यातील तिसऱ्या षटकातील भुवनेश्वर कुमारनच्या दुसऱ्या गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलनं ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या राहुल त्रिपाठीनं उत्कृष्ट झेल पकडून शुभमन गिलला माघारी धाडलं. चक्क एका हातानं राहुल त्रिपाठीनं शुभमन गिलचा झेल पकडला. या झेलला चाहते 'कॅच ऑफ द सीजन' बोलत आहेत. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात आणि हैदराबाद या दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


राहुल त्रिपाठीचा अप्रतिम झेल-



गुजरातचा संघ-
शुभमन गिल, मॅथ्यू वेड (विकेटकिपर), साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन, मोहम्मद शमी, दर्शन नालकांडे.


हैदराबादचा संघ-
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅन्सन, टी. नटराजन, उम्रान मलिक.


हे देखील वाचा-