IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) राजस्थान रॉयल्सचा सात विकेट्सनं पराभव करून आयपीएलचा खिताब जिंकलाय. या सामन्यात गुजरातचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसननं  (Lockie Ferguson) यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकला. या कामगिरीसह त्यानं सनरायजर्स हैदराबादचा  (Sunrisers Hyderabad) युवा गोलंदाज उमरान मलिकचा (Umran Malik) विक्रम मोडलाय. या सामन्यात लॉकी फर्ग्युसननं ताशी 157.3  किलोमीटर/ प्रतितास वेगानं चेंडू टाकलाय. आयपीएलच्या इतिहासातील हा दुसरा सर्वात वेगवान चेंडू ठरलाय. 


आयपीएल 2022 मधील सर्वात वेगवान चेंडू
राजस्थान रॉयल्सच्या डावातील 5व्या षटकात लॉकी फर्ग्युसननं  157.3 किलोमीटर/ प्रतितास वेगानं चेंडू टाकला आहे. याच षटकात त्यानं 154 किलोमीटर/ प्रतितास वेगानंही आणखी एक चेंडू टाकला होता.  या हंगामाच्या सुरुवातीला सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या नावावर होता. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं 157 किलोमीटर/ प्रतितास वेगानं चेंडू टाकला होता.


आयपीएलच्या इतिहास सर्वात वेगवान चेंडू कोणी टाकला?
आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटच्या नावावर आहे. आयपीएलच्या चौथ्या हंगामात त्यानं  157.3  किलोमीटर/ प्रतितास वेगानं चेंडू टाकला होता. अजूनही त्याचा विक्रम कोणत्याही गोलंदाजाला मोडता आलं नाही. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गुजरात टायसन्सला पराभूत करण्याचं आणि दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं. गुजरातकडून पराभव मिळाल्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं संघातील सर्व खेळाडूंचं कौतूक केलं. राजस्थानच्या संघानं यंदाच्या हंगामात चांगलं प्रदर्शन करून दाखवलं आहे, असंही त्यानं म्हटलं आहे. 


हार्दिक पांड्याला सामनावीराचा पुरस्कार
सामन्यात विजयी संघाचा कर्णधार हार्दिकला सामनावीर पुरस्कार मिळाला. त्यानं गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये कमाल कामगिरी केली. गुजरात संघाच्या सर्वच खेळाडूंनी कमाल गोलंदाजी केली. पण कर्णधार हार्दिक पांड्याने मात्र सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत महत्त्वपूर्ण तीन विकेट्स घेतल्या. पांड्यानं 4 षटकात 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यात संजू, बटलर आणि हेटमायर या महत्त्वाच्या विकेट्स होत्या. याशिवाय त्यानं फलंदाजीत 30 चेंडूत 34 धावा केल्या.  ज्यामुळं त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.


हे देखील वाचा-