Gujarat Titans vs Rajasthan Royals, Final : कर्णधार हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) यंदाच्या आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. पदार्पणातच दमदार कामगिरी करणाऱ्या गुजरात संघानं अंतिम सामन्यात राजस्थानचा (Rajasthan Royals) सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात राजस्थाननं गुजरातसमोर अवघ्या 131 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हार्दिक पंड्या आणि सलामीच्या शुभमन गिलनं तिसऱ्या विकेटसाठी 63 धावांची निर्णायक भागीदारी रचून गुजरातला विजयपथावर नेलं. हा सामना जिंकल्यानंतर गुजरातच्या संघानं आणि संघाच्या कर्णधारानं अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 


स्टेज ग्रुपमध्ये अव्वल असणाऱ्याच संघानंच आयपीएलचं विजेतेपद पटकावल्याचं आयपीएलच्या इतिहासात पाचव्यांदा झालं आहे. गुजरातपूर्वी राजस्थान रॉयल्स (2008) आणि मुंबई इंडियन्स (2017, 2019 आणि 2020) यांनी हा विक्रम केला आहे.


हार्दिकच्या नावावर खास विक्रमाची नोंद 


गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्यालाही राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. त्यानं या सामन्यात 17 धावांत 3 बळी घेतले. याशिवाय त्यानं फलंदाजीत 34 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत सामनावीराचा किताब पटकावणारा तो तिसरा कर्णधार ठरला आहे. त्यापूर्वी अनिल कुंबळे आणि रोहित शर्मा यांनीही हा पराक्रम केला आहे. 


गुजरातनं विजेतेपद पटकावलं


गुजरात संघानं अंतिम सामन्यात राजस्थानचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात राजस्थाननं गुजरातसमोर अवघ्या 131 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हार्दिक पंड्या आणि सलामीच्या शुभमन गिलनं तिसऱ्या विकेटसाठी 63 धावांची निर्णायक भागीदारी रचून गुजरातला विजयपथावर नेलं. हार्दिकनं 34 तर शुभमननं नाबाद 45 धावा केल्या. त्याआधी गुजरातच्या प्रभावी आक्रमणासमोर राजस्थानला 20 षटकात 9 बाद 130 धावांचीच मजल मारता आली. जॉस बटलरनं सर्वाधिक 39 धावांचं योगदान दिलं. गुजरातकडून हार्दिक पंड्यानं अवघ्या 17 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर साई किशोरनं दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्मद शमी, यश दयाळ आणि रशिद खाननं प्रत्येकी एक विकेट घेतली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :