GT vs RR, IPL 2022 Final : यंदाची आयपीएल 2022 (IPL 2022) गुजरात टायटन्स संघाने दिमाखात जिंकली आहे. अखेरपर्यंत गुणतालिकेत अव्वल राहत गुजरातने विजयश्री मिळवला आहे. अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्सवर (GT vs RR) 7 गडी राखून विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने केवळ 131 धावांचे माफक आव्हान गुजरातला दिले. गुजरातच्या शुभमन गिलच्या नाबाद 45 आणि मिलरच्या नाबाद 32 तर हार्दिकच्या 34 धावांच्याजोरावर हे आव्हान 18.1 षटकात गुजरातने केवळ तीन गडी गमावून पूर्ण केले. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...


GT vs RR 10 महत्त्वाचे मुद्दे-



  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. नाणेफेक जिंकणारा संघ सामनाही जिंकतो असंच समीकरण झालं आहे. पण आज मात्र राजस्थानने नाणेफेक जिंकूनही त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यांनी घेतलेला फलंदाजीचा निर्णय चुकला.

  2. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर आज गुजरातच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत राजस्थानला अवघ्या 130 धावांवर रोखलं. कर्णधार हार्दिकने यावेळी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. 

  3. पहिली फलंदाजी करणाऱ्या राजस्थानची सुरुवात ठिक झाली होती. पण यशस्वी 22 धावा करुन बाद झाला.

  4. यशस्वी नंतर बटलरने संजूसह खेळी सावरण्याचा प्रयत्न केला. पण संजूही 14 धावांवर बाद झाल्यानंतर पडिक्कल 2 धावा करुन तंबूत परतला.

  5. पण बटलर क्रिजवर असल्यामुळे सर्वांना आशा होती, पण पांड्याने आणखी एक दमदार चेंडूवर बटलरलाही तंबूत धाडलं. ज्यानंतर मात्र एकाही फलंदाजाला टिकून खेळता आलं नाही. बटलरच्या 39 धावा सर्वाधिक राहिल्या.

  6. गुजरात संघाच्या सर्वच खेळाडूंनी कमाल गोलंदाजी केली. पण कर्णधार हार्दिक पांड्याने मात्र सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत महत्त्वपूर्ण तीन विकेट्स घेतल्या. पांड्याने 4 षटकात 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.  

  7. 131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या गुजरात संघाने साहा आणि वेड यांना स्वस्तात माघारी धाडलं.

  8. पण गिल संयमी खेळी करत होत. पांड्याने त्याला 34 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली. पण चहलने पांड्याची महत्त्वाची विकेट घेत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण मिलरने 32 धावांची तुफान खेळी करत गुजरातचा विजय पक्का केला. 

  9. अखेर शुभमनने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत विजयश्री संघाला मिळवून दिला. त्याच्या नाबाद 45 धावा संघासाठी महत्त्वाच्या ठरल्या.

  10. सामन्यात विजयी संघाचा कर्णधार हार्दिकला सामनावीर पुरस्कार मिळाला त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये कमाल कामगिरी केली.  


हे देखील वाचा-