बंगळुरु : आयपीएलचा (IPL 2024) 17 वा हंगाम येत्या २२ मार्चपासून सुरु होणार आहे. पाच वेळा विजेतपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) सोबत होणार आहे. टीम इंडियाचा आणि आरसीबीचा प्रमुख फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) नवा लुक समोर आला आहे.विराट कोहलीचे 2024 च्या आयपीएलच्या पूर्वी नव्या हेअर स्टाइलचे फोटो समोर आले आहेत.गेल्या दोन महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असलेला विराट 2024 च्या आयपीएलच्या माध्यमातून कमबॅक करणार आहे. 


विराट कोहलीनं जानेवारी 2024 मध्ये झालेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेनंतर क्रिकेट खेळलेलं नाही. विराट कोहलीनं इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून वैयक्तिक कारणांमुळं माघार घेतली होती. आता विराट कोहली पुन्हा मैदानावर खेळणार असल्यानं त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.


आरसीबी आणि सीएसके यांच्यात आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिला सामना होणार आहे. विराटचे चाहते गेल्या दोन महिन्यांपासून ज्याची वाट पाहत होते तो दिवस २२ मार्चच्या सीएसके विरुद्धच्या मॅचमुळं जवळ आलेला आहे. यापूर्वीच विराट कोहलीचा ट्रेंडी हेअर स्टाइलचा लुक समोर आला आहे. पॉप्युलर हेअर ड्रेसर अलीम हकीम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट विराट कोहलीच्या नव्या लुकमधील फोटो शेअर केले आहेत.      



विराट कोहलीनं आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या टीमचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आतापर्यंत विराटनं 237 मॅच खेळल्या आहेत. विराटनं आयपीएलमध्ये 7263 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं आयपीएलच्या कारकिर्दीत 7 शतकं केली असून 50 अर्धशतकं केली आहेत. विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 113 ही आहे. कोहलीनं आयपीएलमध्ये 130.02 च्या स्ट्राइक रेटनं आरसीबीसाठी फलंदाजी केली आहे.



आरसीबी आणि चेन्नई गेल्या पाच मॅचमध्ये काय घडलं?


आयपीएलच्या 2024 च्या हंगामाची लढत गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये होणार आहे. दोन्ही टीममध्ये यापूर्वीच्या पाच मॅचमध्ये सीएसकेचं पारडं जड ठरलं आहे. सीएसकेनं गेल्या पाच पैकी चार सामन्यांमध्ये आरसीबीला पराभूत केलं आहे.आरसीबीनं 2022 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला 13 धावांनी पराभूत केलं होतं.


आरसीबीचा संघ : 


फाफ  डु प्लेसिस (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अर्जुन रावत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेट कीपर) सुयश प्रभूदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरॉर, करण शर्मा, मनोज भंडागे, मयांक डागर, विजय व्याशक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रेसी टॉप्ले,  हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमरुन ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंह, सौरव चौहान  


संबंधित बातम्या :


IPL 2024: आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज कोण?; यादीत दिग्गजांचा समावेश, पाहा नावं


IPL 2024: रोहित माझ्या नेतृत्त्वात खेळणार... मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद मिळताच हार्दिक पांड्याच्या बड्या बाता