IPL 2024: आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज कोण?; यादीत दिग्गजांचा समावेश, पाहा नावं
आयपीएलच्या १७व्या हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सर्व संघ तयारीला लागले आहेत. २२ मार्चला आयपीएलच्या नव्या हंगामातील पहिली लढत होणार आहे. या सामन्यासाठीची तिकीट विक्री ऑनलाइन होणार आहे. (ABP CMS Gallery)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या वर्षी विजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात पहिली लढत होणार आहे. (ABP CMS Gallery)
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणारे गोलंदाज तुम्हाला माहिती आहेत का?, सर्वाधिक षटकार नेमक्या कोणत्या गोलंदाजाला मारले, याबाबत जाणून घ्या....(ABP CMS Gallery)
पियुष चावला- २०१ षटकार फिरकीपटू पियुष चावला हा आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणारा गोलंदाज आहे.पियुष चावलाच्या गोलंदाजीवर २०१ षटकार मारले आहेत. गेल्या हंगामात पियुष चावलाने मुंबई इंडियन्ससाठी अप्रतिम गोलंदाजी केली होती. मात्र आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. चावलाने आयपीएलमध्ये आतापर्यंत ३६४० चेंडू टाकले आहेत.(ABP CMS Gallery)
रवींद्र जडेजा- १९३ षटकार राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण करणाऱ्या रवींद्र जडेजाची आयपीएल कारकीर्द चांगली राहिली आहे. गोलंदाजीसोबतच त्याने फलंदाजीतही अद्भुत कामगिरी केली आहे. पण रवींद्र जडेजानेही भरपूर धावा दिल्या आहेत. रवींद्र जडेजाच्या ५९१ षटकांत फलंदाजांनी एकूण १९३ षटकार मारले आहेत. (ABP CMS Gallery)
युजवेंद्र चहल – १९३ षटकार युजवेंद्र चहल हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने १४५ सामन्यांमध्ये १८७ फलंदाजांना बाद केले आहे. बेंगळुरूच्या पाटा विकेटवर कारकिर्दीतील बहुतांश सामने खेळूनही चहलने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. आयपीएलमधील चहलच्या गोलंदाजीवर ५२८.५ षटकांत १९३ षटकार ठोकले आहेत. (ABP CMS Gallery)
रविचंद्रन अश्विन- १८४ षटकार कसोटीतील जगातील सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या रविचंद्रन अश्विनचे नावही या यादीत आहे. १७१ विकेट घेणाऱ्या अश्विनने चेन्नई सुपर किंग्जकडून करिअरची सुरुवात केली होती. सध्या तो राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. आयपीएलच्या इतिहासात अश्विनने आतापर्यंत सर्वाधिक ६९९ षटके टाकली आहेत. तर अश्विनच्या गोलंदाजीवर १८४ षटकार मारले आहेत. (ABP CMS Gallery)
अमित मिश्रा- १८२ षटकार फिरकीपटू अमित मिश्रा हा आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅट्ट्रिक घेणारा गोलंदाज आहे. एकेकाळी विकेट घेण्याच्या बाबतीत तो भारतीय गोलंदाजांमध्ये अव्वल होता. मिश्राने १६१ सामन्यांमध्ये १७३ फलंदाजांना बाद केले आहे. गेल्या काही हंगामात त्याला फार कमी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. अमित मिश्राच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी एकूण १८२ षटकार मारले आहेत. (ABP CMS Gallery)