एक्स्प्लोर

CSK VS RCB Virat Kohli : विराट कोहलीचा नेटमध्ये तीन वेगवेगळ्या बॅट घेऊन सराव, धोनीच्या चेन्नईविरोधात वेगळीच स्ट्रॅटेजी वापरणार?

CSK VS RCB IPL 2025 Virat Kohli : एक काळ असा होता जेव्हा फिरकी गोलंदाज विराट कोहलीला शांत ठेवत असायचे. पण गेल्या वर्षीपासून त्याने फिरकीविरुद्धच्या खेळात खूप सुधारणा केली आहे.

Chennai Super Kings vs Royal Challengers Bengaluru IPL 2025 : एक काळ असा होता जेव्हा फिरकी गोलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) शांत ठेवत असायचे. पण गेल्या वर्षीपासून त्याने फिरकीविरुद्धच्या खेळात खूप सुधारणा केली आहे. याची झलक आयपीएल 2025 च्या सुरुवातीच्या सामन्यातही दिसून आली, जेव्हा कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले आणि सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती सारख्या फिरकी गोलंदाजांना चांगले धू धू धुतले. कोहलीने पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध 36 चेंडूत 59 धावा केल्या होत्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. कोहली गेल्या हंगामात ज्या लयीत होता त्याच लयीत दिसला. 

आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबी त्यांच्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जशी सामना करणार आहे. चेपॉक मैदान हे चेन्नई सुपर किंग्जचा गड राहिला आहे, या सामन्यातही सर्वांच्या नजरा कोहलीवर असतील. परंतु या स्टार फलंदाजाला रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि नूर अहमद सारख्या सीएसकेच्या फिरकी त्रिकुटाकडून कठीण आव्हान मिळेल, ज्यांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना खूप त्रास दिला होता.

चेपॉक स्टेडियमवर कोहलीचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. आरसीबीकडून खेळताना त्याने या स्टेडियमवर 14 सामन्यांमध्ये 28.14 च्या सरासरीने आणि 108.24 च्या स्ट्राईक रेटने 394 धावा केल्या. सीएसकेच्या फिरकी गोलंदाजांना तोंड देण्यासाठी कोहलीही घाम गाळत आहे.  यावेळी विराट कोहली नेटमध्ये तीन वेगवेगळ्या बॅट घेऊन सराव करताना दिसला ज्याचा व्हिडिओ होत आहे. 

चेपॉकमध्ये विराट कोहलीची कामगिरी  

विराट कोहलीने चेपॉकमध्ये दोनदा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याला आता सीएसकेच्या फिरकीपटूंविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. गेल्या हंगामाच्या सुरुवातीला कोहलीला संघर्ष करावा लागला होता आणि तो फिरकीपटूंविरुद्ध आक्रमक फलंदाजी करू शकला नाही. पण, त्याने हंगामाच्या उत्तरार्धात त्याच्या कमकुवत मुद्द्यांवर काम केले आणि फिरकीपटूंविरुद्ध धावा केल्या. कोहलीने 2024 च्या हंगामातील पहिल्या सहा डावांमध्ये 141.77 च्या स्ट्राईक रेटने 319 धावा केल्या ज्यामध्ये 29 चौकार आणि 12 षटकारांचा समावेश होता. हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात कोहलीने पुढील नऊ डावांमध्ये 166.14 च्या स्ट्राईक रेटने 422 धावा केल्या, ज्यात 33 चौकार आणि 26 षटकारांचा समावेश होता.

हे ही वाचा -

BCCI Bowling Coach : बीसीसीआयमध्ये नोकरीची मोठी संधी; कोणत्या पोस्टसाठी जागा? जॉब मिळवण्यासाठी अर्ज कसा कराल?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलीब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Embed widget