GT vs PBKS, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स (GT vs PBKS) या दोन्ही संघात सामना पार पडणार आहे. दरम्यान गुजरातचा संघ यंदाच्या हंगामातील टेबल टॉपर असून त्यांनी केवळ एक सामना गमावला आहे. गुणतालिकेचा विचार करता गुजरातने आतापर्यंत 9 पैकी 8 सामने जिंकत सर्वात वर स्थान मिळवलं असून त्यामुळेच आजचा विजय त्यांचं पुढील फेरीचं तिकिट जवळपास निश्चित करेल. दुसरीकडे पंजाब संघाने 9 पैकी 4 सामने जिंकल्याने ते गुणतालिकेत थेट आठव्या स्थानावर  आहेत. दरम्यान आतापर्यंतच्या सामन्यांत खेळाडूंच्या फॉर्मचा विचार करता कोणत्या 11 (Probable 11) खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष असेल ते पाहूया...


गुजरात विरुद्ध पंजाब अशी असेल ड्रीम 11 (GT vs PBKS Best Dream 11)


विकेटकीपर- रिद्धिमान साहा


फलंदाज- मयांक अगरवाल, हार्दिक पांड्या, डेविड मिलर, शिखर धवन


ऑलराउंडर- लियाम लिव्हिंगस्टोन, राहुल तेवतिया, राशिद खान


गोलंदाज- राहुल चाहर,राशिद खान, मोहम्मद शमी 


कसा आहे पिच रिपोर्ट?


आजचा सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात पार पडणार आहे. आतापर्यंत या ठिकाणी पार पडणाऱ्या सामन्यांमध्ये फलंदाजासह गोलंदाजांना मदत मिळाल्याने सामने चुरशीचे होत आहे. मोठी धावसंख्या उभी राहत नसली तरी सामना अटीतटीचा होत आहे.  आजचा सामना सायंकाळच्या सुमारास होणार असल्याने दुसऱ्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण येऊ शकते, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा सामना प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल.


हे देखील वाचा-