Tom Moody Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals IPL 2022 : ब्रेबॉर्न स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून हैदराबादचा पराभव झाला. दिल्लीने हैदराबादचा 21 धावांनी पराभव केला. या पराभवानंतरही सनराइजर्स हैदराबादचे मुख्य कोच टॉम मूडी टेन्शनमध्ये नाहीत. ते खूश आहेत. कारणही तसेच आहे. टॉम मुडी म्हणाले की, 'आमचा संघ चांगला क्रिकेट खेळून हारला आहे. खराब खेळ झाला नाही.' हैदराबादच्या संघाचा हा तिसरा पराभव आहे. हैदराबादचा संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे.


मूडी म्हणाले की, " जर आम्ही खराब खेळलो असतो तर चिंतेचं कारण होतं. पण आम्ही चांगले क्रिकेट खेळलो आहे. जर काही गोष्टी व्यवस्थित झाल्या असत्या तर आम्ही लक्षाचा यशस्वी पाठलाग केला असता. आम्ही लक्षाच्या किती जवळ पोहचलो, हे सर्वांनी पाहिलेय. निकोलस पूरनने 34 चेंडूत 62 धावांची खेळी केली."  आम्ही लवकरच पुनरागमन करु. पराभवाला विसरुन विजयाच्या पटरीवर येऊ, असा विश्वास आहे. आम्ही आणखी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहेत, असेही मुडी म्हणाले. टॉम मुडी यांना हैदराबादचा संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवेल, अशी आशा आहे. 


 दिल्लीने दिलेल्या 208 धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाने पलटवार केला. हैदराबादच्या संघ अवघ्या 21 धावांनी पिछाडीवर राहिला. पूरन आणि एडन मार्करम यांनी 104 धावा जोडल्या. पण इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. इतर खेळाडूंना फक्त 71 धावाच करता आल्या. केन विल्यमसनचा फॉर्मही रुसला आहे. त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलेय. 


 दरम्यान, हैदराबादचे कोच टॉम मुडी यांनी वॉशिंगटन सुंदर आणि वेगवान गोलंदाज टी नटराजन यांच्या दुखापतीची माहितीही दिली. ते म्हणाले की, वॉशिंगटन सुंदरच्या दुखापतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. त्याच्या योग्य ते उपचार सुरु आहे. 14 तारखेला पुण्यात होणाऱ्या सामन्यासाठी नटराजन उपलब्ध असण्याची शक्यता आहे.  


हे देखील वाचा-