IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) इतिहासातील सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. एबीडीनं 184 आयपीएल सामन्यांमध्ये 25 वेळा ‘सामनावीर’ हा पुरस्कार पटकावला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात गुरुवारी झालेल्या आयपीएल 2022च्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरनं सामनावीराचा पुरस्कार जिंकला. सर्वाधिक ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावण्याच्या बाबतीत वॉर्नर आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. या कामगिरीसह त्यानं चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागं टाकलं आहे. तर, रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. 


डेव्हिड वार्नची चमकदार कामगिरी
हैदराबादविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सकडून वॉर्नरनं नाबाद 92 धावांची खेळी केली, ज्याच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 207 धावांची मोठी धावसंख्या उभारली. 158 व्या सामन्यात वॉर्नरला 18व्या वेळी ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आलं.आयपीएलमध्ये रोहित शर्मानं 222 सामने खेळले असून 18 वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे. तर, महेंद्रसिंह धोनी 230 सामन्यांत 17 वेळा सामनावीर ठरला आहे.


आयपीएलमधील सर्वाधिक धावा
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत वॉर्नरनं रोहितला मागं टाकलं आहे. या सामन्यापूर्वी रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, आता वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी आहे. त्याच्या नावावर 6499 धावांची नोंद आहे. त्यानंतर शिखर धवन 5805 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.  वार्नर 5805 तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. रोहित शर्मा 5766 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.


हे देखील वाचा-