IPL 2022: दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड मिलरला (David Miller) टी-20 क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाज म्हणून ओळखलं जातं. आयपीएलमध्येही डेव्हिड मिलरनं अनेक वादळी खेळी केल्या आहेत. परंतु, मिलरनं 2013 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना अशी अशी खेळी खेळली, जी आजही आयपीएलच्या इतिहासात स्मरणात आहे. डेव्हिड मिलरनं आरसीबीविरुद्ध त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. डेव्हिड मिलरच्या वादळी खेळीला आज 9 वर्ष पूर्ण झाली आहेत.
आरसीबीनं दिलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची खराब सुरुवात
आयपीएल 2013 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि आरसीबी यांच्यात सामना झाला होता. मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर हा सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात पंजाबच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेतेश्वर पुजारा, ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्सच्या झंझावाती खेळीच्या जोरावर आरसीबी संघानं पंजाबसमोल 20 षटकांत 191 धावांचे मोठं लक्ष्य दिलं. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि संघानं 7.4 षटकांत 51 धावांत 3 विकेट गमावल्या.
मिलरचं आयपीएलमधील पहिलं वादळी शतक
त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डेव्हिड मिलरनं आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. त्यानं आरसीबीच्या प्रत्येक गोलंदाजाला रिमांडवर घेऊन चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. या सामन्यात डेव्हिड मिलरनं 38 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीनं नाबाद 101 धावा केल्या. ज्यामुळं पंजाबच्या संघानं 6 विकेट्स राखून आरसीबीला पराभूत केलं होतं.
डेव्हिड मिलरची आयपीएलमधील कामगिरी
डेव्हिड मिलरला आयपीएलच्या इतिहासात किलर मिलर म्हणूनही ओळखले जाते. दरम्यान, डेव्हिड मिलरच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर मिलरने आतापर्यंत 99 आयपीएल सामने खेळले आहेत. यादरम्यान डेव्हिड मिलरच्या बॅटमधून 137.6 च्या सर्वोत्तम स्ट्राइक रेटनं 2261 धावा केल्या आहेत.मिलरची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे आरसीबीविरुद्ध नाबाद 101 धावांची खेळी. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात डेव्हिड मिलर गुजरात टायटन्सच्या संघाचा भाग आहे
हे देखील वाचा-
- SRH vs DC 2022: शतकासाठी फक्त 8 धावांची गरज, पण तरीही वार्नरनं... पॉवेलनं सांगितलं अखरेच्या षटकातील दोघांमधील संभाषण
- IPL 2022: भुवनेश्वर कुमारनं मोडला आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम, इरफान पठाणच्या विक्रमाशी केली बरोबरी
- Asian Games 2022 Postponed : कोरोनामुळे आशियाई क्रीडा स्पर्धा स्थगित; चिनी माध्यमांची माहिती