SRH vs DC 2022: मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 50 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबादचा संघ (Delhi Capitals Vs Sunrisers Hyderabad) आमने सामने आले होते. हा सामना दिल्लीच्या संघानं 21 धावांनी जिंकला. या सामन्यात हैदराबाच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला होता. त्यानंतर दिल्लीच्या संघानं 20 षटकात 3 विकेट्स गमावून हैदराबादसमोर 208 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. दिल्लीकडून सलामीवीर डेव्हिड वार्नर आणि रोव्हमन पॉवेल यांनी तुफानी खेळी केली. परंतु, दिल्लीच्या डावातील अखेरच्या षटकात डेव्हिड वार्नर शतकासाठी 8 धावांची गरज असतानाही त्यानं आपल्या शतकाची पर्वा केली नाही. अखेरच्या षटकात डेव्हिड वार्नर रोव्हन पॉवेलला नेमका काय म्हणाला? हे जाणून घेऊयात. 


दिल्ली आणि हैदराबाद यांच्यातील सामना पार पडल्यानंतर पॉवेलनं दिल्लीच्या डावातील अखेरच्या षटकांबद्दल वॉर्नरशी झालेल्या संभाषणाबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, "डेव्हिड वार्नर 92 धावांवर नॉन स्ट्राईकर इंडला होता. त्यावेळी मी त्याला शतक पूर्ण करण्यासाठी एक धाव काढून देऊ का अशी विचारणा केली. पण, त्यावेळी वार्नर म्हणाला की, क्रिकेट हा असा खेळ आहे, जो नेहमी सांघिक भावनेने खेळला पाहिजे.  क्रिकेटमधील तुमच्या वैयक्तिक मैलाच्या दगडाचा विचार करण्याऐवजी संघाचा विचार करायला हवा." वॉर्नरचे हे ज्ञान प्रत्येक पिढीच्या क्रिकेटपटूसाठी आवश्यक आहे.


या सामन्यात हैदराबादच्या संघानं नाणेफेक जिंकून दिल्लीच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर दिल्लीच्या संघानं 20 षटकात 3 विकेट्स गमावून हैदराबादसमोर 208 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. दिल्लीकडून सलामीवीर डेव्हिड वार्नर आणि रोव्हमन पॉवेल यांनी तुफानी खेळी केली. दिल्लीनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादचा संघ 20 षटकात 8 विकेट्स गमावून 186 धावा करून शकला. या विजयासह दिल्लीच्या संघानं यंदाच्या हंगामातील पाचवा विजय नोंदवला असून गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. 


हे देखील वाचा-