SRH vs PBKS, IPL 2022 : यंदाच्या आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील 70 व्या सामन्यात पंजाब किंग्स संघाने सनरायजर्स हैदराबादवर (PBKS vs SRH) 5 गडी राखून विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने 158 धावांचे माफक आव्हान पंजाबला दिले. पण लियाम लिव्हिंगस्टोनच्या तुफानी खेळीच्या जोरावर हे आव्हान 15.1 षटकात पंजाबने 5 गडी गमावून पूर्ण केले. तर या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...


SRH vs PBKS 10 महत्त्वाचे मुद्दे-



  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर आज पंजाबच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत हैदराबादला 157 धावांवर रोखलं. हरप्रीत ब्रारने यावेळी भेदक गोलंदाजी केली. 

  2. पहिली फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची सुरुवात खराब झाली अवघ्या 4 धावा करुन सलामीवीर प्रियाम बाद झाला. 

  3. प्रियाम बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याला खास साथ मिळाली नाही. इतर खेळाडू काही धावा करत तंबूत परतले. 

  4. अभिषेक शर्माने केवळ 43 धावांची एकहाती झुंज दिली. त्याच्या खेळीमुळे संघाची धावसंख्या 157 धावांपर्यंत पोहोचली.

  5. पंजाबकडून नॅथन अॅलीस आणि हरप्रीत ब्रार यांनी सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर कागिसो रबाडा याने देखील एक विकेट घेतली. 

  6. 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पंजाब संघाकडून बेअरस्टो आणि धवन जोडीच्या मदतीने चांगली सुरुवात केली.

  7. पण बेअरस्टो 23 धावांवर बाद झाला. शिखर मात्र टिकून होता. 

  8. शाहरुखने आणि जितेश यांनी प्रत्येकी 19 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

  9. लियाम याने मात्र अत्यंत तुफान खेळी केली. त्याने 22 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. यावेळी 2 चौकार आणि 5 षटकार त्याने ठोकले. ज्यामुळे पंजाबने 15.1 षटकातचं आव्हान पार करत स्पर्धेचा शेवट गोड केला.


हे देखील वाचा-