IND vs SA T20 Series: आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेनं 16 जणांचा संघ जाहीर केला. त्यानंतर भारतानंही आज दक्षिण आफ्रिकाविरुद्ध संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत भारताचा युवा फलंदाज केएल राहुल संघाची धुरा संभळणार आहे. तर, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांसारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर दिनेश कार्तिकचं तीन वर्षानंतर पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन झालंय. त्याच्याशिवाय, वेगवान खेळाडू उमरान मलिकही भारतीय टी- 20 संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.

आयपीएल 2022 मध्ये दिनेश कार्तिकची उत्कृष्ट कामगिरी
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेत दिनेश कार्तिकचं भारतीय संघात एन्ट्री झाली आहे. तो गेल्या तीन वर्षांपासून संघाबाहेर होता. त्यानं त्याचा शेवटचा टी-20 सामना 27 फेब्रुवारी 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिनेश कार्तिकनं दमदार कामगिरी करून दाखवली आहे. आरसीबीकडून खेळतान त्यानं अनेक सामन्यात फिनिशरची भूमिका बजावली आहे. त्यानं आयपीएल 2022 मध्ये त्यानं 57. 40 च्या सरासरीनं आणि 191.3 स्ट्राईक रेटनं 287 धावा केल्या. यादरम्यान, तो 9 वेळा नाबाद राहिला आहे.  

कार्तिकची आगामी विश्वचषक खेळण्याची इच्छा
आयपीएलमधील आपल्या स्वप्नाविषयी बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला की, सध्या टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये आपले स्थान निश्चित करणे हे त्याचं लक्ष्य आहे. यासाठी तो खूप मेहनत घेत आहेत. याशिवाय टीम इंडियानं पुन्हा एकदा आयसीसी टूर्नामेंट जिंकावी अशी माझी इच्छा असल्याचं त्यानं सांगितलं होतं.

भारत- दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक- 

सामना तारिख ठिकाण
पहिला टी-20 सामना  9 जून दिल्ली
दुसरा टी-20 सामना 12 जून  कटक
तिसरा टी-20 सामना 14 जून विशाखापट्टनम
चौथा टी-20 सामना 17 जून राजकोट
पाचवा टी-20 सामना 19 जून बंगळुरू


भारतीय टी-20 संघ:
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक. 

दक्षिण आफ्रिका टी-20 संघ:
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नोर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी वॅन डर डसन, मार्को जॅनसेन.

हे देखील वाचा-