SRH vs PBKS : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा शेवटचा लीग सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात सुरु आहे. या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स (SRH vs PBKS) दोन्ही संघ आमने-सामने आहेत. सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा काहीसा वेगळा निर्णय घेतला. जो निर्णय त्यांना भोवला असून पंजाबने भेदक गोलंदाजी करत त्यांना 157 धावांत त्यांना रोखले आहे. यावेळी अभिषेक शर्माने काहीशी झुंज देत 43 धावा केल्यामुळे संघ इथवर मजल मारु शकला आहे.
सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत हैदराबादने फलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना सायंकाळी असून देखील हैदराबादने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना दवाची अडचण येण्याची शक्यता असतानाही हैदराबादने हा निर्णय घेतला यामागील कारण एक मोठी धावसंख्या उभी करुन पंजाबवर दबाव आणणं हे असू शकतं. पण पंजाबच्या तुफान गोलंदाजीमुळे हे हैदराबादला करता आलं नाही. त्यांच्याकडून फलंदाजांनी अतिशय सुमार फलंदाजी केल्यामुळे संघा 20 षटकात 8 विकेट्सच्या बदल्यात 157 धावाच करु शकला. ज्यामुळे आता विजयासाठी पंजाबला 158 धावांची गरज आहे. यावेळी हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 43 धावा केल्या.
नॅथन, हरप्रीतचीची भेदक गोलंदाजी
पंजाबच्या साऱ्याच गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी केली. यावेळी नॅथन अॅलीस आणि हरप्रीत ब्रार यांनी सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. यावेळी हरप्रीतने सर्वोत्तम गोलंदाजी करत 4 ओव्हरमध्ये 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर नॅथननने 4 ओव्हरमध्ये 41 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यावेळी कागिसो रबाडा याने देखील एक विकेट घेतली.
हे देखील वाचा-
- ENG vs IND Test: पाच महिन्यानंतर पुजाराचं पुनरागमन, कसं मिळवलं भारतीय कसोटी संघाचं तिकीट?
- ENG vs IND: इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा; पुजाराचं पुनरागमन
- Team India Squad against South Africa : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ जाहीर, केएल राहुलकडे कर्णधारपद तर उम्रान मलिकला संधी