IPL Playoffs 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामात प्लेऑफमध्ये आतापर्यंत फक्त हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सने जागा पक्की केली आहे. अद्याप प्लेऑफच्या तीन संघाची निवड झाली नाही. तीन जागांसाठी सात संघामध्ये चुरस सुरु आहे. चेन्नई आणि मुंबई संघाचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. शनिवारी कोलकात्याकडून झालेला पराभव हैदराबादच्या चांगलाच जिव्हारी लागणारा ठऱलाय. कारण हैदराबादचे प्लेऑफमधील आव्हान खडतर झालेय. 


कोलकात्याविरोधातील पराभवाने बदलले गणित -
शनिवारी झालेल्या सामन्यात कोलकाताने हैदराबादचा 54 धावांनी पराभव केला.  हैदराबादचा हा सातवा पराभव होय. केन विल्यमसनच्या नेतृत्वातील हैदराबाद संघाला 12 सामन्यात फक्त पाच विजय मिळवता आले आहे. हैदराबादने उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवला तरी प्लेऑफमधील आव्हान खडतर आहे. लखनौ, राजस्थान, आरसीबी, दिल्ली, पंजाब आणि कोलकाता या संघाकडेही प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. यामधील काही संघाचे याआधी 14 गुण झाले आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत लखनौ, राजस्थान आणि आरसीबी सर्वात आघाडीवर आहेत. 
 
हैदराबाद प्लेऑफमध्ये कसे पोहचणार? 
सनराइजर्स हैदराबादला उर्वरित दोन्ही सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. असे झाल्यास हैदराबादचे सात सामन्यात 14 गुण होतील.  नेट रनरेटही सुधारावा लागणार आहे. त्याशिवाय इतर संघाच्या विजय आणि पराभव याचाही विचार करावा लागणार आहे. 
 
आरसीबीचा गुजरात टायट्न्सकडून पराभव व्हावा... त्यानंतर आरसीबीचे 14 गुण राहतील.  


दिल्ली कॅपिटल्सचा अखेरच्या दोन्ही सामन्यात पराभव व्हावा लागेल... दिल्लीचे अखेरचे दोन सामने पंजाब आणि मुंबईविरोधात आहेत.  


कोलकात्याचा लखनौ सुपर जायंट्सकडून पराभव व्हायला हवा.. कोलकात जिंकला तरी त्यांचा नेट रनरेट कमी असावा.


वरील सर्व समीकरणं हैदराबादच्या बाजूने असतील तरच विल्यमसनचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे.  


 


हे देखील वाचा-


IPL 2022: 'उमरान मलिकनं माझा विक्रम मोडला तर...' श्रीनगर एक्स्प्रेसबाबत शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य


CSK vs GT, Toss Update : नाणेफेक जिंकत धोनीनं निवडली फलंदाजी; चेन्नई संघात चार बदल, पाहा आजची अंतिम 11


CSK vs GT, Match Live Updates: चेन्नईने नाणेफेक जिंकत निवडली फलंदाजी, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर