Sanju Samson : आयपीएलच्या (IPL 2022) 15 व्या सीजनला सुरुवात होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्स संघाच्या मॅनेजमेंटमधून एक वादाची बातमी समोर आली. या वादामागील कारण ठरलं राजस्थान रॉयल्स संघाच्या अधिकृत ट्वीटर हँडवरुन करण्यात आलेली एक पोस्ट. या सोशल मीडिया पोस्टवर कर्णधार संजू सॅमसन भडकल्यानंतर पोस्ट करणाऱ्या सोशल मीडिया टीमवर संघ व्यवस्थापनाने कारवाई केली. 


तर ही पोस्ट नेमकी काय होती असा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला असेल, तर ही पोस्ट होती संघाचा कर्णधार ऋषभ पंतबाबत. राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर हँडलवरुन शुक्रवारी संजू सॅमसनचा एक बसमध्ये बसलेला फोटो शेअर केला होता. ज्यात त्याच्या डोक्यावर एक भलीमोठी टोपी घालण्यात आली होती. तसचं त्याच्या कानात झुमके घालण्यात आले होते. या पोस्टला 'क्या खूब लगते हो' असं कॅप्शननही दिलं होतं. दरम्यान या पोस्टवर संजू सॅमसन चांगलाच भडकला आणि या पोस्टला रिप्लाय देत , 'मित्रांनो हे सगळ ठिक आहे, पण संघानी प्रोफेशनल असावं'. 




दरम्यान संजूच्या या पोस्टनंतर राजस्थान रॉयल्सच्या संघ व्यवस्थापनाने एक अधिकृत स्टेटमेंट देत त्यात लिहिलं की, 'आज घडलेल्या गोष्टी पाहता आम्ही आमच्या सोशल मीडिया टीममध्ये काही बदल करत आहोत. आम्ही लवकरच एक नवी सोशल मीडिया टीम देखील नियुक्त करणार आहोत.'



हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha