IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काहीच तास शिल्लक राहिले आहेत. या हंगामातील पहिला सामना अधिक रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. कारण, आयपीएलमधील दोन दमदार संघ आज आमने- सामने येणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्डेडिअमवर चेन्नई आणि कोलकाता यांच्यात  सामना रंगणार आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामातील अंतिम सामन्यात चेन्नई आणि कोलकाता एकमेकांशी भिडले होते. या सामन्यात कोलकात्याला पराभूत करून चेन्नईनं चौथ्यांदा आयपीएलचा खिताब जिंकला. दरम्यान, चेन्नई आणि कोलकाता यांच्यात कोणाचं पारडं जडं आहे? यावर एक नजर टाकुयात.


चेन्नई आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत एकूण 28 सामने खेळले गेले आहेत. यातील 18 सामन्यात चेन्नईच्या संघानं कोलकात्याला पराभूत केलंय. तर, केवळ 9 सामन्यात कोलकात्याला चेन्नईला पराभूत करता आलंय. या आकडेवारीनुसार, चेन्नईच्या संघाचं पारडं जड दिसत आहे. आजच्या सामन्यात दोन्ही संघ नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. यामुळं आजच्या सामन्यात कोण बाजी मारतंय? हे पाहणे अधिक महत्वाचं ठरणार आहे. 


चेन्नई- कोलकाता यांच्यातील खास आकडेवारी
- केकेआरविरुद्ध सीएसकेचा सर्वोच्च स्कोअर 220 आहे आणि किमान स्कोअर 55 आहे.
- सीएसकेविरुद्ध केकेआरचा सर्वोच्च स्कोअर 202 आणि सर्वात कमी स्कोअर 61 आहे.
- सुरेश रैनाने (610) चेन्नईकडून कोलकाता विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर, चेन्नईविरुद्ध कोलकाताकडून आंद्रे रसेल 284 धावा केल्या आहेत. 
- कोलकाता विरुद्ध चेन्नईकडून रवींद्र जडेजानं सर्वाधिक 20 विकेट घेतल्या आहेत. तर, सुनील नारायणला चेन्नईविरुद्ध 20 विकेट्स मिळाल्या आहेत. 


चेन्नई सुपर किंग्स-
रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी), रॉबिन उथाप्पा (2 कोटी), ड्वेन ब्राव्हो (4.40 कोटी), अंबाती रायुडू (6.75 कोटी), दीपक चहर (14 कोटी), शिवम दुबे (4 कोटी), महिश तिक्षाना (70 लाख), सिमरनजीतसिंग (20 लाख), डेवॉन कॉनवे (1 कोटी), ड्वेन प्रिटोरियस (50 लाख), मिचेल सॅन्टनर (1.90 कोटी), अडम मिल्न (1.90 कोटी), केएम आसिफ (20 लाख), तुषार देशपांडे (20 लाख). शुभ्रांशु सेनापती (20 लाख), मुकेश चौधरी (20 लाख), प्रशांत सोळंकी (1.20 कोटी) ,ख्रिस जॉर्डन (3.60 कोटी), एन जगदीशन (20 लाख), सी. हरी निशांत(20 लाख), भगत वर्मा(20 लाख), राजवर्धन हंगरगेकर (1.50 कोटी). 



कोलकाता नाईट रायडर्स- 
आंद्रे रसेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), वेंकटेश अय्यर (8 कोटी), सुनील नारायण (6 कोटी), पॅट कमिन्स (7.25 कोटी), श्रेयस अय्यर (12.25 कोटी), नितीश राणा (8 कोटी), शिवम मावी (7.25 कोटी), शेल्डन जॅकसन (60 लाख), अजिंक्य रहाणे (1 कोटी), रिंकू सिंह (55 लाख), अनुकूल रॉय (20 लाख), रसिक डार (20 लाख), बाबा इंद्रजीत (20 लाख), चमिका करुणारत्ने (50 लाख), प्रथम सिंह (20 लाख), अभिजीत तोमर (40 लाख).



हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha