Fastest Centuries In IPL: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएस पंधराव्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. या हंगामतील पहिला सामना चेन्नई आणि कोलकाता यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्डेडिअमवर खेळला जाणार आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंच्या नावावर विविध विक्रमांची नोंद आहे. मात्र, आयपीएलमध्ये जलद शतक ठोकण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत एकमेव भारतीय खेळाडूचं नाव आहे. तर, या यादीत 'द युनिव्हर्सल बॉस' क्रिस गेल अव्वल स्थानी आहे.
1) ख्रिस गेल
वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलं आपल्या आक्रमक खेळीमुळं जगभरात प्रसिद्ध आहे. त्यानं मैदानावर असताना भल्या भल्या गोलंदाजांची शाळा घेतली आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रमही ख्रिस गेलच्या नावावर आहे. आयपीएलच्या सहाव्या हंगामात पुणे वॉरियसविरुद्ध सामन्यात ख्रिस गेलनं तुफानी खेळी केली होती. या सामन्यात त्यानं केवळ 30 चेंडूत 100 धावा केल्या होत्या. याच सामन्यात त्यानं 64 चेंडूत 175 धावा करण्याचा इतिहास रचला होता.
2) यूसुफ पठान
आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याच्या यादीत युसूफ पठाण ऐकमेव भारतीय खेळाडू आहे. त्यानं आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध 37 चेंडूत शतक ठोकलं होतं. त्यावेळी राजस्थान संघाचा कर्णधार शेन वॉर्नने त्याच्या खेळीचे कौतूक केले होते. तसेच आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
3) डेविड मिलर
आयपीएलच्या तेराव्या हंगामात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड मिलरनं किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना आरसीबीविरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली होती. या सामन्यात त्यानं 38 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले होते. तसेच या सामन्यातील आठराव्या षटकात षटकार ठोकून त्यानं किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाला विजय मिळवून दिला होता.
4) अॅडम गिलख्रिस्ट
ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टनं आयपीएलच्या पहिल्याच सत्रात डेक्कन चार्जर्सकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध अवघ्या 42 चेंडूत शतक ठोकलं होतं.
5) एबी डिव्हिलियर्स
आरसीबीचा धोकादायक फलंदाज एबी डिव्हिलियर्सनं 2016 मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध 43 चेंडूत शतक झळकावलं. यात 12 षटकारचा समावेश होता.
6) डेव्हिड वार्नर
सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वार्नरनं कोलकाताविरुद्ध 43 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं. या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022: श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी! एकानं वनडेत चोपलं, दुसऱ्यानं कसोटीत धुतलं, आज दोघंही आमने-सामने
- IPL 2022 : आजपासून आयपीएल 2022 ची सुरुवात, 10 संघांत लढत, पहिल्या सामन्यात कोलकाता आणि चेन्नई आमनेसामने
- IPL 2022, CSK vs KKR : सर रवींद्र जाडेजापुढे श्रेयस अय्यरचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha