IPL 2022, CSK vs KKR : आयपीएलच्या 15 व्या हंगामाचा थरार अवघ्या काही तासानंतर सुरु होणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर आयपीएलमधील पहिला सामना रंगणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नवे संघ दाखल झाले आहेत. त्यामुळे दहा संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील चार मैदानावर 70 सामने होणार आहेत. तब्बल दोन महिने आयपीएलचा कुंभमेळावा रंगणार आहे. आयपीएलच्या नव्या मोसमाआधी मेगा लिलाव पार पडला होता. जवळपास सगळ्या फ्रँचायझींनी आपल्या संघात मोठे बदल केलेले पाहायला मिळणार आहेत. 


आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्स आणि उपविजेता कोलकाता नाइट रायडर्स यांच्या सामन्याद्वारे होणार आहे. दोन्ही संघ नव्या कर्णधारसोबत मैदानात उतरणार आहेत. चेन्नईच्या कर्णधारपदाची धुरा वीरेंद्र जाडेजाच्या खांद्यावर आहे तर कोलकाताचं नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. श्रेयस अय्यरने याआधी दिल्ली संघाचं नेतृत्व केले आहे. तर रवींद्र जाडेजा पहिल्यांदाच नेतृत्व करत आहे. ( Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) यंदा प्रत्येक संघातील खेळाडू नवे असतील. इतकेच नाही तर मैदानंही बदलली आहेत. पण प्रत्येक सामन्यागणिक वाढणारी उत्सुकता, उत्कंठावर्धक सामने आणि स्पर्धेचा जोश सुरुवातीपासून शेवटपर्यंत तसाच राहणार आहे. आयपीएलची हीच खासियत आहे. आणि तेच या स्पर्धेचं वेगळेपण आहे. तेव्हा आयपीएलच्या नव्या मोसमासाठी सज्ज व्हा.


कधी आहे सामना?
शनिवारी, 26 मार्च रोजी सामना होणार आहे. 
कुठे आहे सामना?
मुंबईतील वानखेडे मैदानावर सामना रंगणार
किती वाजता होणार सामना? 
शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता होणार सामना
कुठे पाहता येणार सामना?
चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


चेन्नई सुपर किंग्सचे शिलेदार


रवींद्र जाडेजा (16 कोटी), महेंद्रसिंग धोनी (12 कोटी), मोईन अली (8 कोटी), ऋतुराज गायकवाड (6 कोटी), रॉबिन उथाप्पा (2 कोटी), ड्वेन ब्राव्हो (4.40 कोटी), अंबाती रायुडू (6.75 कोटी), दीपक चहर (14 कोटी), शिवम दुबे (4 कोटी), महिश तिक्षाना (70 लाख), सिमरनजीतसिंग (20 लाख), डेवॉन कॉनवे (1 कोटी), ड्वेन प्रिटोरियस (50 लाख), मिचेल सॅन्टनर (1.90 कोटी), अडम मिल्न (1.90 कोटी), केएम आसिफ (20 लाख), तुषार देशपांडे (20 लाख). शुभ्रांशु सेनापती (20 लाख), मुकेश चौधरी (20 लाख), प्रशांत सोळंकी (1.20 कोटी) ,ख्रिस जॉर्डन (3.60 कोटी), एन जगदीशन (20 लाख), सी. हरी निशांत(20 लाख), भगत वर्मा(20 लाख), राजवर्धन हंगरगेकर (1.50 कोटी)


कोलकाता नाईट रायडर्सचा संघ


आंद्रे रस्सेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (8 कोटी), वेंकटेश अय्यर (8 कोटी), सुनील नारायण (6 कोटी), पॅट कमिन्स (7.25 कोटी), श्रेयस अय्यर (12.25 कोटी), नितीश राणा (8 कोटी), शिवम मावी (7.25 कोटी), शेल्डन जॅकसन (60 लाख), अजिंक्य रहाणे (1 कोटी), रिंकू सिंह (55 लाख), अनुकूल रॉय (20 लाख), रसिक डार (20 लाख), बाबा इंद्रजीत (20 लाख), चमिका करुणारत्ने (50 लाख), प्रथम सिंह (20 लाख), अभिजीत तोमर (40 लाख), अशोक शर्मा (55 लाख), सॅम बिलिंग्स (2 कोटी), आरॉन फिंच (1.5 कोटी), टीम साऊदी (1.5 कोटी), रमेश कुमार (20 लाख), मोहम्मद नबी (1 कोटी), उमेश यादव (2 कोटी), अमान खान (20 लाख)