RR Vs MI, IPL 2022 Live Update : गुजरातनं सामना जिंकला! बंगळुरूचा सहा विकेट्सनं पराभव, विराटचं अर्धशतक व्यर्थ
RR Vs MI, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 43 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे.
LIVE
Background
RR Vs MI, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 43 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. या हंगामात दोन्ही संघानं चांगली कामगिरी करून दाखवली आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरातचा संघ अव्वल स्थानी आहे. तर, बंगळुरूचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. गुजरातनं आठ पैकी सात सामने जिंकले आहेत. तर, एक सामना गमावला आहे. दुसरीकडं बंगळुरूच्या संघाला नऊ पैकी सहा सामन्यात विजय मिळवता आला आहे.
फॅफ डू प्लेसिस नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुसमोर शनिवारी ‘आयपीएल’मध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सचं आव्हान असणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणारा हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याचे गुजरातचे लक्ष्य असेल.
कधी, कुठे पाहणार सामना
गुजरात टायटन्स आणि आरसीबी यांच्यातील सामना मुंबईतील ब्रेबॉन स्टेडिअममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 3. 30 वाजता सुरू होईल. दुपारी 3 वाजता नाणेपेक होईल.वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
राजस्थानचा संभाव्य संघ-
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिकल, संजू सॅमसन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, नॅथन कुल्टर-नाईल, प्रशांत कृष्णा, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल
मुंबईचा संभाव्य संघ-
इशान किशन (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंग, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.
हे देखील वाचा-
गुजरातनं सामना जिंकला! बंगळुरूचा सहा विकेट्सनं पराभव, विराटचं अर्धशतक व्यर्थ
GT Vs RCB: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएलच्या 43 व्या सामन्यात गुजरात टायटन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 6 विकेट्सनं पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून बंगळुरूच्या प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बंगळुरूच्या संघानं 20 षटकात 6 विकेटस् गमावून धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातच्या संघानं 6 विकेट्स राखून हा सामना जिंकला. गुजरातच्या विजयात अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलरनं महत्वाची भूमिका बजावली
GT vs RCB, IPL 2022: गुजरातला चौथा झटका, साई सुदर्शन आऊट
बंगळुरुच्या संघानं दिलेल्या 171 धावांचा पाठलाग करण्यसाठी मैदानात उतरलेल्या गुजरातच्या संघाची सुरुवात खराब झाली. साई सुदर्शनच्या रुपात गुजरातनं चौथी विकेट्स गमावली आहे.
GT vs RCB, IPL 2022: गुजरातला तिसरा धक्का, कर्णधार हार्दिक पांड्या बाद
GT vs RCB, IPL 2022: शाबाज अहमद याने गुजरातला आणखी एक धक्का दिला. शाबाज अहमद याने गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला तीन धावांवर बाद केले. गुजरात तीन बाद 78 धावा
GT vs RCB, IPL 2022: गुजरातला दुसरा धक्का, शुबमन गिल बाद
GT vs RCB, IPL 2022: शाबाज अहमद याने गिलला बाद करत आरसीबीला दुसरे यश मिळवून दिलेय. गिल 31 धावा काढून माघारी परतला. गुजरात दोन बाद 68 धावा
GT vs RCB, IPL 2022: गुजरातला पहिला धक्का, साहा बाद
GT vs RCB, IPL 2022: वानंदु हसरंगा याने वृद्धीमान साहाला बाद करत गुजरातला पहिला धक्का दिला. साहा 29 धावांवर बाद झाला