RR Vs LSG LIVE Score Updates, IPL 2022: अखेरच्या षटकात कुलदीप सैनची भेदक गोलंदाजी, राजस्थानचा 3 धावांनी विजय
RR Vs LSG LIVE Score Updates: युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन राजस्थानचं नेतृत्व करत आहेत. तर, केएल राहुलकडं लखनौच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या वीसाव्या सामन्यात राजस्थाननं लखनौला धावांनी पराभूत केलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राजस्थानच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 165 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाला 162 धावापर्यंत मजल मारता आली.
आजच्या सामन्यात लखनौच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. चौथ्या षटकात लखनौनं तीन मोठे विकेट्स गमावले आहेत.
राजस्थानकडून मैदानात उतरलेल्या ट्रेन्ट बोल्टनं पहिल्या षटकात लखनौला दोन मोठे झटके दिले आहेत. केएल राहुलनं कष्णप्पा गौथमही माघारी परतला आहे.
राजस्थाननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या लखनौच्या संघाला मोठा धक्का लागला आहे. कर्णधार केएल राहुल शून्यावर बाद झाला आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील वीसाव्या सामन्यात राजस्थानच्या संघानं लखनौसमोर 166 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून 165 धावा केल्या आहेत. राजस्थानकडून शिमरॉन हेटमायरनं तुफानी खेळी केली आहे.
लखनौविरुद्ध सुरु असलेल्या हेटमायरनं अर्धशतक ठोकून संघाचा डाव सावरला आहे.
आजच्या सामन्यात राजस्थानचा संघ मोठी धावसंख्या उभा करेल, असं वाटत असताना लखनौच्या संघानं जोरदार कमबॅक केलं आहे. 10 षटकात राजस्थाननं चार विकेट्स गमावून 67 धावा केल्या आहेत.
मुंबईच्या वानखेडे मैदानात सुरु असलेल्या लखनौविरुद्ध सामन्यात राजस्थानला जॉस बटलरच्या रुपात पहिला झटका बसला आहे.
राजस्थाविरुद्ध नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थानकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या देवदत्त पडिकल आणि जॉस बटलरनं संघाला चांगली सरुवात करून दिली आहे. राजस्थानचा स्कोर 39/0 (4)
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (क), क्विंटन डी कॉक (डब्ल्यू), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौथम, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई, आवेश खान
जॉस बटलर, रॅसी व्हॅन डर डुसेन, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर) शिमरॉन हेटमायर, रियान पराग, कुलदीप सेन, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल.
RR Vs LSG, Toss Report: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील वीसाव्या सामन्यात राजस्थान आणि लखनौचा संघ (Rajasthan Royals Vs Lucknow Super Giants) एकमेकांशी भिडणार आहे. मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पार्श्वभूमी
RR Vs LSG LIVE Score Updates: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील वीसाव्या सामन्यात राजस्थान आणि लखनौचा संघ एकमेकांशी भिडणार आहे. आजच्या सामन्यात दोन युवा कर्णधार आमने- सामने येणार आहेत. युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन राजस्थानचं नेतृत्व करत आहेत. तर, केएल राहुलकडं लखनौच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मागच्या सामन्यात राजस्थानला आरसीबीकडून चार विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. तर, लखौनच्या संघानं दिल्लीचा चार विकेट्सनं पराभव केला होता.
राजस्थान आणि लखनौची आतापर्यंतची कामगिरी
राजस्थाननं आतापर्यंत तीन सामने खेळले असून दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, एका सामन्यात पराभूत झाले आहेत. दुसरीकडं लखनौच्या संघाची सुरुवात चांगली झाल्याचं पाहायला मिळत आहे. लखौनं पहिला सामना गमवल्यानंतर अखेरच्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत राजस्थानचा संघ पाचव्या तर, लखौनचा संघ चौथ्या स्थानावर आहे.
राजस्थानचा संघ-
संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकिपर), जॉस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, प्रसीद कृष्णा, युझवेंद्र चहल, नॅथन कुल्टर-नाईल, करुण नायर, जेम्स नीशम, रस्सी व्हॅन डर डुसेन, केसी करिअप्पा, डॅरिल मिशेल, ओबेद मॅककॉय, तेजस बारोका, कुलदीप यादव, अनुनय सिंग, कुलदीप सेन, ध्रुव जुरेल, शुभम गढवाल.
लखनौचा संघ-
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौथम, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान, मनीष पांडे, शाहबाज नदीम, मनन वोहरा, दुष्मंता चमीरा, काइल मेयर्स, अंकित राजपूत, मार्कस स्टॉइनिस, मोहसिन खान, करण शर्मा, मयंक यादव.
हे देखील वाचा-
- RCB on Virat Kohli Wicket: विराटला चुकीच्या पद्धतीनं आऊट देण्याच्या निर्णयावर आरसीबीची मोठी प्रतिक्रिया
- IPL 2022: चेन्नईच्या 'या' निर्णयावर रवी शास्त्रींनी उपस्थित केले प्रश्न, समोर ठेवली संघाची सर्वात मोठी चूक
- RCB Vs MI: मुंबईचा सलग चौथा पराभव, बंगळुरूनं 7 विकेट्स राखून सामना जिंकला
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -