विधान परिषद जागेसाठी आर आर पाटील यांनी संजयकाका पाटील यांचा अर्ज आणला होता, पण त्यांना सांगितलं होतं की हा भरवशाचा नाही, पण आर आर पाटील यांच्या आग्रहास्तव आमदार केलं, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजयकाका पाटील यांच्यावर तोफ डागली. 


याच माणसानं विधानसभेसाठी अर्ज भरला


शरद पवार म्हणाले की, एकदा विधानपरिषदेसाठी आर आर आबांनी संजयकाकांचे नाव सुचविले, पण ज्या दिवशी नाव जाहीर केले त्यावेळी संजयकाका भाजपमध्ये गेले. 10 वर्ष खासदार म्हणून काम केले, एक कार्यक्रम संजयकाकानी घेतला होता. उद्याच्या निवडणुकीमध्ये काय चित्र आहे असे विचारल्यावर सगळे व्यवस्थित आहे असे काका म्हणाले आणि 8 दिवसाने वाचले की याच माणसानं विधानसभेसाठी अर्ज भरला.


त्यांना विजयी कराच, पण मतांचा विक्रम करा 


खासदार असताना काम केले नाही, आता कारखाना आणि संघ या संस्था कोणत्या स्थितीत आहेत यावरून ती व्यक्ती कसे आहे हे समजते. आता हीच व्यक्ती रोहितच्या विरोधात ही व्यक्ती उभी आहे. जनता मात्र रोहितच्या पाठीशी उभी राहील हा विश्वास आहे. आर आर आबांचा वारसा रोहित चालवत असेल, तर तुतारीवर बटन दाबून रोहीतला विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.  त्यांनी सांगितले की, आज आर आर नाही याचे दुःख आहे, तुम्ही जगले पाहिजे असे आम्ही बोललो होतो, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकत नाही असे हॉस्पिटलमध्ये मी आर आर ना बोललो होतो. आर आर तासगावपुरते नव्हते, तर महाराष्ट्रभर आर आर आणि कुटूंबाचे चौकशी करत होते. त्यांची पुढची पिढी उभी राहत असेल तर त्यांना विजयी कराच, पण मतांचा विक्रम करा. 


प्रत्येक निवडणुकीत पैसे फेकायचे आणि निवडणुका जिंकायच्या, मोदींवर हल्लाबोल


पवार यांनी मोदी यांच्यावरही तोफ डागली. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीची जबाबदारी नरेंद्र मोदी यांनी घेतली होती. आणि ते जाईल त्या ठिकाणी जाऊन सांगत होते की मला 400 जागा द्या. 250 जागा असताना देखील सरकार चालवत येत. सरकार चालविण्यासाठी 400 जागांची आवश्यकता लागत नाही. त्यांच्या मनात वेगळा विचार सुरू होता, त्यामुळे त्यांना 400 जागा पाहिजे आहेत. नरेंद्र मोदी यांना देशात 400 जागा मिळू नयेत यासाठी देशातील विरोधी पक्ष केलं आणि सुदैवाने त्याला आम्हाला यश आलं. देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे पण त्यांना आम्ही 400 जागा मिळू दिल्या नाहीत. प्रत्येक निवडणुकीत पैसे फेकायचे आणि निवडणुका जिंकायच्या हे काम यांचं आहे. लाडक्या बहिणीला पैसे देण्यापेक्षा तिचे आज संरक्षण करणे महत्त्वाचं आहे. देशातील प्रत्येक तासाला पाच महिलांवर अत्याचार होत आहेत. महिलांनाच संरक्षण करू शकत नाही अशा लोकांच्या हातात सत्ता द्यायची का? हा महाराष्ट्र आता तरुणांनी चालवायचा आहे. त्यासाठी तरुणांना निवडून द्यायचं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या