RR vs GT, IPL 2023 Live: राजस्थान आणि गुजरातमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
IPL 2023, RR vs GT : गुजरात आणि राजस्थान या संघामध्ये रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे.
गुजरातचा राजस्थानवर नऊ विकेटने विजय
गुजरातला पहिला धक्का बसला आहे. शुभमन गिल 36 धावांवर बाद झालाय
गिल-साहा यांनी दमदार फलंदाजी करत राजस्थानची गोलंदाजी फोडून काढली. दोघांनी नाबाद 66 धावांची भागिदारी केली आहे.
वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल संयमी फलंदाजी करत आहेत.
गुजरातच्या गोलंदाजांनी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर हल्लाबोल केला. राशिद खान आणि नूर अहमद या अफगाण गोलंदाजीसमोर राजस्थानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. राजस्थानचा डाव 118 धावांवर संपुष्टात आला. गुजरातला विजयासाठी 119 धावांचे माफक आव्हान आहे.
राजस्थानला नववा धक्का बसलाय... ट्रेंट बोल्ट बाद
गुजरातच्या गोलंदाजांनी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर हल्लाबोल केला. राशिद खान आणि नूर अहमद या अफगाण गोलंदाजीसमोर राजस्थानच्या फलंदाजांनी नांगी टाकली.
घरच्या मैदानावर राजस्थानची फलंदाजी ढेपाळली. गुजरातच्या भेदक माऱ्यासमोर राजस्थानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. राजस्थानचे आठ फलंदाज तंबूत परतले आहेत. राजस्थान संघाने 14 षटकात आठ बाद 96 धावा केल्या आहेत.
राजस्थानला चौथा धक्का बसला आहे. संजू सॅमसन आणि आर अश्विन बाद झालेत.
राजस्थानला दुसरा धक्का बसला आहे. फॉर्मात असलेला यशस्वी जायस्वाल धावबाद झालाय. यशस्वीने 14 धावांचे योगदान दिले.
राजस्थानला पहिला धक्का, जोस बटलर बाद झालाय. हार्दिक पाड्याने बटलरला तंबूत पाठवले
हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), राशिद खान, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद, जोशवा लिटल
यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हिटमायर, रविचंद्रन अश्विन, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), ध्रुव जुरेल, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, अॅडम झम्पा
राजस्थानने नाणेफेक जिंकली, प्रथण फलंदाजीचा निर्णय
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात आज, 05 मे रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर (Sawai Mansingh Indoor Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. त्याआधी संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Titans) या दोन संघात आतापर्यंत 4 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड आहे. गुजरात संघाने चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, राजस्थान संघाला फक्त एकच सामना जिंकता आला आहे. दोन्ही संघांची सरासरी धावसंख्या 180 आहे.
पार्श्वभूमी
IPL 2023, RR vs GT : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 48 व्या सामन्यात गुजरात (GT) आणि राजस्थान (RR) दोन संघ आमने-सामने येणार आहेत. गतविजेता गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील ही लढत राजस्थानच्या घरच्या मैदानावर पार पडणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर (Sawai Mansingh Indoor Stadium) 7.30 वाजता ही लढत पाहायला मिळणार आहे.
IPL 2023 RR vs GT Match 48 : राजस्थान आणि गुजरात आमने-सामने
गजविजेता गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील ही लढत पार रंजक ठरणार आहे. दोन्ही संघ यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करताना दिसत आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत टॉप 4 मध्ये पाय रोखून आहेत. सध्या गुजरात संघ पॉईंट्स टेबलसध्ये पहिल्या स्थानावर तर, राजस्थान चौथ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांना मागील सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. गुजरात संघाला मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे मागील सामन्यात राजस्थान संघाला मुंबई इंडियन्सने मात दिली होती. आज गुजरात आणि राजस्थान पराभवाचा बदला घेऊन विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील.
RR vs GT Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Titans) या दोन संघात आतापर्यंत 4 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड आहे. गुजरात संघाने चार पैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, राजस्थान संघाला फक्त एकच सामना जिंकता आला आहे. दोन्ही संघांची सरासरी धावसंख्या 180 आहे.
RR vs GT IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात आज, 05 मे रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर (Sawai Mansingh Indoor Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. त्याआधी संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
RR vs GT Probable Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11
RR Probable Playing 11 : राजस्थान रॉयल्स
यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हिटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), डीसी जुरेल, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.
GT Probable Playing 11 : गुजरात टायटन्स
शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), राशिद खान, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -