Rohit Sharma Viral Video मुंबई: आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये काल मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) यांच्यातील मॅच पार पडली. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव झाला. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ त्यांच्या कामगिरीऐवजी टीम मॅनेजमेंटमुळं चर्चेत राहिला. हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा वेगवेगळ्या कारणांमुळं चर्चेत होते. कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मॅच होती. त्या मॅचपूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अभिषेक नायर एक व्हिडीओ केकेआरनं पोस्ट केला होता.  केकेआरनं तो व्हिडीओ नंतर हटवण्यात आला. मात्र, नेटकऱ्यांनी तोपर्यंत व्हिडीओ डाऊनलोड करुन टावला होता. त्या व्हिडीओमुळं रोहित शर्मा आता सतर्क झाल्याचा पाहायला मिळतंय. काल लखनौ विरुद्धच्या मॅचमधील रोहित शर्माचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये रोहित शर्मा कॅमेरामनला आवाज  बंद करण्याचं आवाहन केलं. एका ऑडिओनं वाट लागल्याचं सांगतं ऑडिओ बंद करण्याची विनंती केली.  


रोहितच्या नव्या व्हायरल व्हिडीओत काय?


लखनौ सुपर जाएंटस आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर काल मॅच पार पडली. त्या मॅचपूर्वी रोहित शर्मा धवलकुर्णी सोबत हास्य विनोद करत होता. यावेळी हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला. रोहित शर्मा कॅमेरामनला म्हणतो, "भावा ऑडिओ बंद कर यार, एका ऑडिओनं पहिल्यांदा माझी वाट लावलीय." रोहितनं यावेळी हात जोडल्याचं देखील दिसून आलं.  






रोहित शर्माचा आणि अभिषेक नायरचा व्हिडीओ व्हायरल


कोलकाता नाईट रायडर्सचा सहायक कोच अभिषेक नायर आणि रोहित शर्मा यांचा एक व्हिडीओ यापूर्वी व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ केकेआरनं पोस्ट केला होता, नंतर तो हटवण्यात आला होता. व्हिडीओत रोहित म्हणत होता की, एक एक गोष्ट बदलत आहे... ते त्यांच्यावर आहे... जे माझं आहे ते माझं घर आहे, ते जे मंदिर आहे ना ते मी बनवलंय, असं रोहित शर्मानं म्हटलं. 






 



अभिषेक नायर आणि रोहित शर्माच्या या व्हिडीओनंतर मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये सर्वकाही आलबेन नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आलं होते. आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सनं गुजरातचा कॅप्टन असलेल्या हार्दिकला संघात घेत त्याला टीमचं नेतृत्त्व करण्याची जबाबदारी दिली होती. तर, रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सला पाचवेळा विजेतेपद मिळवून दिलं होतं.  


संबंधित बातम्या :


IPL 2024, RCB vs CSK: प्लेऑफचं तिकीट कुणाला मिळणार? चेन्नई की बंगळुरु,जाणून घ्या संभाव्य प्लेइंग XI, पिच रिपोर्ट 


मोठी बातमी : गौतम गंभीरला टीम इंडियाचा कोच होण्याचा आग्रह, BCCI ची विनंती मान्य होणार?