मुंबई :मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) विरुद्ध 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबईचा हा आयपीएलमधील (IPL 2024) दहावा पराभव ठरला.  रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि नमन धीर यांनी अर्धशतकं करुन मुंबईला विजयाजवळ नेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही. रोहित शर्मा आणि नमन धीर वगळता मुंबईच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही. टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) नमन धीरची फलंदाजी ही सकारात्मक गोष्ट असल्याचं म्हटलं. सेहवाग क्रिकबझच्या कार्यक्रमात बोलत होता. रोहित शर्माच्या आयपीएलमधील पुढील प्रवासाबाबत देखील सेहवागनं मोठं वक्तव्य केलं.


विरेंद्र सेहवाग यांनी तुम्ही गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर तुमचं अभियान संपवता त्यावेळी निराशा तर असते. नमन धीरची फलंदाजी ही मुंबईसाठी सकारात्मक गोष्ट आहे. पुढील हंगामासाठी चांगला खेळाडू मिळालाय. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत नमन धीरनं 62 धावा केल्या, त्यानं चांगले चौकार षटाकर लगावले असं विरेंद्र सेहवाग म्हणाला. 


 मुंबई इंडियन्स 2022 च्या आयपीएलमध्ये दहाव्या स्थानावर होती. मात्र, 2023 मध्ये मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचली होती. पुढील सीझनमध्ये मुंबई चांगली टीम बनेल, चांगली कामगिरी करेल, प्लेऑफमध्ये पोहोचेल, ट्रॉफीपर्यंत पोहोचतील, अशी आशा आहे, असं विरेंद्र सेहवागनं म्हटलं. 



रोहित शर्मा मैदानात होता तोपर्यंत आवश्यक धावगतीनं धावा होत आहेत, असं वाटतं होतं. मुंबईकडून तिलक वर्मा, टिम डेविड देखील संघात नव्हता. नेहाल वढेरा, नमन धीर यांच्यासाठी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणं ही पहिली गोष्ट होती. 



रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स सोबत अखेरचा सामना होता का? असा प्रश्न विचारण्यात आला असता विरेंद्र सेहवागनं होय, असं उत्तर दिलं. आपण सध्या फक्त अंदाज वर्तवतोय, मात्र जेव्हा ऑक्शन असेल तेव्हाच कळेल, असं सेहवागनं सांगितलं.   


 
मुंबई इंडियन्सनं 47 बॉल डॉट खेळले. म्हणजेच जवळपास 8 ओव्हरमध्ये मुंबईनं धावा केल्या नाहीत. मुंबईनं डॉट बॉल कमी खेळले असते, एक रन जरी काढली तरी तुम्ही मॅच जिंकू शकला असता, असं विरेंद्र सेहवागनं म्हटलं. 


पाच संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर


आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून  मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज,गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जाएंटस प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले आहेत. आज होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्या मॅचनंतर प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ कोणता हे ठरणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद या तीन संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. 


संबंधित बातम्या :


मोठी बातमी : गौतम गंभीरला टीम इंडियाचा कोच होण्याचा आग्रह, BCCI ची विनंती मान्य होणार?


मुंबईचा शेवटही पराभवानेच, लखनौचा 18 धावांनी विजय, रोहितचं अर्धशतक व्यर्थ