RCB vs CSK बंगळुरु : आयपीएल 2024 (IPL 2024)  आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. आज चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आमने सामने येणार आहेत. बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ही मॅच होणार आहे. आरसीबी आणि चेन्नई प्लेऑफच्या (Playoffs) उंबरठ्यावर आहेत. चेन्नईकडे 13 मॅचमध्ये  14 गुण आहेत. तर आरसीबीकडे 12 गुण आहेत. चेन्नईनं विजय मिळवल्यास ते प्लेऑफमध्ये पोहोचतील. तर, दुसरीकडे आरसीबीला मोठ्या फरकानं चेन्नईवर विजय मिळवत चांगल्या नेट रनरेटच्या आधारे प्रवेश मिळू शकतो. आरसीबीला चेन्नईवर 18 पेक्षा अधिक धावांनी किंवा 18.1 एक ओव्हरपूर्वी जी धावसंख्या असेल ती पूर्ण करावी लागेल.  


पिच रिपोर्ट


एम चिन्नास्वामी स्टेडियमध्ये पिच बॅटिंगसाठी फायदेशीर ठरते. हैदराबादनं या मैदानावर 287 धावांची खेळी केली होती. आरसीबीनं त्याचा पाठलाग करताना 262 धावा केल्या होत्या. ड्यूच्या कारणामुळं टॉस जिंकणारा कॅप्टन पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेऊ शकतो.


चिन्नास्वामीवरील रेकॉर्ड


यंदाच्या आयपीएलमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर आतापर्यंत 6 मॅच झाल्या आहेत. यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघानं 3 वेळा तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांनी 3 वेळा मॅच जिंकल्या आहेत. आरसीबीला होम ग्राऊंडवर विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. चेन्नईनं या मैदानावर 11 मॅच खेळल्या असून त्यांनी 6 वेळा विजय मिळवला आहे. 


CSK आणि RCB हेड टू हेड


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमध्ये 32 वेळा आमने सामने आले आहेत. चेन्नईनं  21 वेळा विजय मिळवला तर  10 वेळा आरसीबीचा विजय झाला आहे. एका मॅचचा निकाल लागू शकला नाही.  


RCB vs CSK मॅच कुठं पाहणार?


आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील मॅच टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर आणि मोबाईल आणि टॅबलेडवर जिओ सिनेमावर पाहता येईल.  


संभाव्य संघ:


RCB ची संभाव्य प्लेइंग XI: विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, स्वप्निल सिंह


CSK ची संभाव्य प्लेइंग XI: रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दूल ठाकुर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंह


संबंधित बातम्या : 


मोठी बातमी : गौतम गंभीरला टीम इंडियाचा कोच होण्याचा आग्रह, BCCI ची विनंती मान्य होणार?


मुंबईचा शेवटही पराभवानेच, लखनौचा 18 धावांनी विजय, रोहितचं अर्धशतक व्यर्थ