Rohit Sharma Abhisehk Nayar Viral Video कोलकाता : आयपीएलमध्ये (IPL 2024) आज कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर 60 वी मॅच होणार आहे. या लढतीत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders ) आमने सामने येणार आहेत. या मॅचपूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कोलकाताचा सपोर्टिंग स्टाफ अभिषेक नायर (Abhishek Nayar) यांच्यातील चर्चेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. खरंतर हा व्हिडीओ केकेआरनं पोस्ट केलाहोता. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केकेआरनं त्यांची पोस्ट डिलीट केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध असून यासंदर्भात  दावे प्रतिदावे केले जात आहेत. रोहित शर्मा आणि अभिषेक नायरची चर्चा स्पष्टपणे समजत नसली तरी जेवढं समजतंय त्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे. 


रोहित शर्मा आणि अभिषेक नायरमध्ये नेमकी काय चर्चा झाली? 


रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर केकेआरनं पोस्ट केला होता. यामध्ये मैदानावरील प्रेक्षकांचा गोंधळ देखील ऐकायला येत असल्यानं दोघांची चर्चा स्पष्टपणे समजत नाही. रोहित शर्मा म्हणतो,"एक-एक गोष्ट बदलत आहे, ते त्यांच्यावर आहे, जे पण आहे ते माझे घर आहे भावा, ते मंदिर आहे ना ते मी बनवलं आहे. भावा माझं काय, माझं तर हे शेवटचं", असं रोहित शर्मा म्हणत असल्याचा दावा करण्यात येतो. काही जणांनी यावरुन ही मोठी बातमी असल्याचं म्हटलंय. रोहित शर्मा पुढील आयपीएल मुंबईकडून खेळणार का याबाबत देखील चर्चा सुरु झाल्या. काहींनी रोहित शर्मा पुढचं आयपीएल कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळेल का असा प्रश्न उपस्थित केला. 






रोहित शर्मानं हे माझं शेवटचं असं काही म्हटलंच नसल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. आयकॉनिक हिटमॅन या एक्स प्लॅटफॉर्मवरील यूजरनं रोहित शर्मानं तसं वक्तव्य केलं नसल्याचं म्हटलंय. 


दुसरं ट्विट







रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांच्यातील चर्चा स्पष्टपणे समजत नाही. हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. रोहित शर्मा आणि अभिषेक नायर यांच्यात मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन पदाबाबत चर्चा सुरु असल्याचा अंदाज लावला जात आहे.


दरम्यान, मुंबईचं नेतृत्त्व यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या करतोय. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबईची कामगिरी निराशाजनक झालीय. रोहित शर्मा मुंबईचा कॅप्टन नसल्याची गोष्ट चाहत्यांना अजूनही पचनी पडलेली नाही. मुंबई इंडियन्सचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपलं असून गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर आहेत.


संबंधित बातम्या :


Rohit Sharma : ये हिरो, काय करतोय...रोहित शर्मानं घेतली तिलक वर्माची फिरकी, मुंबई इंडियन्सकडून व्हिडीओ शेअर


IPL 2024 Points Table :गुजरातनं चेन्नईला पराभवाची धूळ चारली, प्लेऑफच्या आशा जिवंत, ऋतुराज गायकवाडचं टेन्शन वाढलं