IPL 2024 CSK vs GT:  गुजरात टायटन्सने (GT) चेन्नई सुपर किंग्सवर (CSK) 35 धावांनी विजय मिळवला आहे. गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) आणि साई सुदर्शन (Sai Sudarshan) यांनी चेन्नईच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. या सामन्यात साई सुदर्शनने 51 चेंडूत 103 धावांची खेळी खेळली. तर शुभमन गिलने 104 धावांची खेळी केली. धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईने 196 धावा केल्या. 


चेन्नईची सुरुवात खूपच खराब झाली. चेन्नईने 10 धावांत 3 विकेट गमावल्या. मात्र, डॅरिल मिचेल आणि मोईन अली यांच्यात 109 धावांची भागीदारी झाली. मिचेलने 34 चेंडूत 63 धावा केल्या, ज्यात त्याने 7 चौकार आणि 3 षटकार मारले. तर अलीने 36 चेंडूत 56 धावांची खेळी केली, ज्यामध्ये त्याने केवळ 4 चौकार आणि 4 षटकार मारले. मात्र हे दोघेही संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत.






राशिद खानच्या षटकाने सामना फिरवला-


शेवटच्या 3 षटकात चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी 64 धावांची गरज होती. राशिद खान 18व्या षटकात गोलंदाजी करायला आला. त्याने आपल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रवींद्र जडेजाला झेलबाद केले. जडेजाने 10 चेंडूत 18 धावा केल्या. मिचेल सँटनरही षटकाच्या 5व्या चेंडूवर शून्य धावांवर बाद झाला. धोनी क्रीजवर असला तरी 2 षटकात 62 धावा करणे जवळपास अशक्य होते. या 2 विकेट्ससह राशिद खानने जीटीचा विजय जवळपास निश्चित केला होता.


शुभमन गिल आणि साई सुदर्शनने केले विक्रम-


गुजरात टायटन्ससाठी शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोन्ही सलामीवीरांनी शतकी खेळी खेळली. गिलने 55 चेंडूत 104 धावा केल्या, ज्यात त्याने 9 चौकार आणि 6 षटकार मारले. दुसरीकडे, सुदर्शनने 51 चेंडूत 103 धावांची खेळी केली. यामध्ये त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि 7 षटकार आले. गिल-सुदर्शन ही आयपीएलच्या इतिहासात सामन्याच्या एका डावात शतके झळकावणारी तिसरी जोडी आहे. याशिवाय गिल आणि सुदर्शन यांनी आयपीएलच्या इतिहासात पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे. गिल आणि सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी केली. त्याच्या आधी 2022 मध्ये क्विंटन डी कॉक आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी केली होती.


संबंधित बातम्या:


Virat Kohli and Anushka Sharma: आयपीएल सुरु असताना विराट कोहली अन् अनुष्का शर्माला लॉटरी; 4 वर्षांच्या गुंतवणुकीतून 271 टक्के नफा


क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही कमाईत चौकार-षटकार; केरळ, मुंबईत आलिशान बंगले, सचिन तेंडुलकरची संपत्ती किती?


Suryakumar Yadav Net Worth: महागड्या गाड्यांची आवड, मुंबईत आलिशान घर; गोलंदाजांना धू धू धुणाऱ्या सूर्यकुमार यादवची संपत्ती किती?