IPL 2024 Points Table :गुजरातनं चेन्नईला पराभवाची धूळ चारली, प्लेऑफच्या आशा जिवंत, ऋतुराजचं टेन्शन वाढलं
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपरकिंग्जला 35 धावांनी पराभूत करत प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुजरात टायटन्सनं केलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ 8 विकेटवर 196 पर्यंत मजल मारू शकला. डॅरिल मिशेलनं 63 आणि मोईन अलीनं 56 धावा केल्या. मोहित शर्मानं 3 विकेट घेतल्या तर राशिद खाननं 2 विकेट घेतल्या होत्या.
शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या शतकांच्या जोरावर गुजरातनं 3 विकेटवर 231 धावा केल्या होत्या. शुभमन गिलनं 55 बॉलमध्ये 104 धावा तर साई सुदर्शननं 51 बॉलमध्ये 103 धावा केल्या होत्या.
गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करत गुण तालिकेत आठव्या स्थानावर झेप घेतली. गुजरात टायटन्सचे पाच विजयांसह 10 गुण आहेत. मात्र, नेट रनरेट चांगलं नसल्यानं 10 गुण असणाऱ्या आरसीबीपेक्षा ते एका स्थानानं मागं आहेत. आरसीबी सातव्या स्थानावर आहे.
कोलकाता नाईट रायडर्स सध्या 16 गुणांसह आणि चांगल्या नेट रनरेटच्या जोरावर पहिल्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स दुसऱ्या तर सनरायजर्स हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्ज 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जाएंटस 12 गुणांसह अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. मुंबई इंडियन्स 8 गुणांसह नवव्या तर पंजाब किंग्ज 8 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.