अहमदाबाद : आयपीएलमध्ये (IPL) काल गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आमने सामने आले होते. गुजरातनं या मॅचमध्ये चेन्नईला 35 धावांनी पराभूत करत आयपीएलमधील आपलं आव्हान कायम ठेवलं. चेन्नईनं टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातनं शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या शतकांच्या जोरावर 231 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईला अपयश आलं. महेंद्रसिंह धोनीनं 11 बॉलमध्ये 26 धावांची खेळी केली मात्र तो संघाला यश मिळवून देऊ शकला नाही. चेन्नईच्या डावाच्या 20 व्या ओव्हरमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला. महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यानं थेट आयपीएलची सुरक्षा (IPL Security Breach) भेदली आणि मैदानावर एंट्री घेतल्यानं थोडा वेळ गोंधळ उडाला होता.
महेंद्रसिंह धोनीचे सलग दोन षटकार आणि चाहता थेट मैदानात
महेंद्रसिंह धोनी 17 व्या ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी मैदानात आला. त्यानंतर 20 व्या ओव्हरच्या पहिल्या आणि दुसऱ्या बॉलवर धोनीनं सलग दोन षटकार मारले आणि तिसऱ्या बॉलवर त्यानं एकही रन घेतली नाही. मात्र, यानंतर धोनीच्या चाहत्यानं आयपीएलची सुरक्षा भेदली आणि तो मैदानात धोनीच्या दिशेनं धावत सुटला. धोनी जवळ पोहोचल्यानंतर त्यानं धोनीला मिठी मारली आणि धोनीच्या पाय पडून त्याला नमस्कार केला.
धोनीची लोकप्रियता कायम
महेंद्रसिंह धोनीनं गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद मिळवून दिलं होतं. महेंद्रसिंह धोनीचं वय सध्या 42 वर्ष असून तो जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. सध्या धोनी जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसला तरी त्याच्या लोकप्रियतेत कमी झालेली नाही. चेन्नईची मॅच ज्या ठिकाणी असेल तिथं धोनीचे चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.
महेंद्रसिंह धोनीनं 20 व्या ओव्हरमध्ये राशिद खानला पहिल्याच बॉलवर हेलिकॉप्टर शॉट मारत षटकार लगावला. यानंतर दुसऱ्या बॉलवर देखील धोनीनं एका हातानं सिक्स मारला. यानंतर धोनीच्या चाहत्यानं आयपीएलची सुरक्षा भेदली आणि धोनीच्या पाया पडला. यानंतर त्याला सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतल मैदनावरुन बाहेर नेलं.
दरम्यान, गुजरात टायटन्सनं पराभवाची मालिका खंडीत केली आहे. गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्जवर 35 धावांनी विजय मिळवला. धोनीनं 11 बॉलमध्ये 26 धावांची खेळी केली. यामध्ये त्यानं तीन सिक्स मारले.
संबंधित बातम्या :