Rohit Sharma Record in IPL : आयपीएलच्या 54 (IPL 2023) व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघाचा पराभव केला. मुंबईने बंगळुरुचा सहा विकेट्सने दणदणीत पराभव केला. मुंबईकडून सूर्यकुमार यादव, नेहाल वढेरा आणि इशान किशन यांनी चांगली खेळी केली. सूर्यकुमारच्या 83 धावांच्या झंझावाती खेळीसह मुंबईने हा सामना जिंकला.  दरम्यान, मुंबई संघाने हा सामना जिंकला असला, तरी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माचा डाव थोडक्यात आटोपला. रोहित शर्मा फक्त सात धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या खेळीसोबतच रोहितच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. 


रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम


बंगळुरु विरुद्धचा सामना जिंकल्यानंतरही मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याच्या लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. मुंबईकडून सलामीला उतरलेला रोहित शर्मा अवघ्या सात धावा करून बाद झाला. गेल्या काही काळापासून रोहित शर्मा खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्माला त्याच्या नावाला साजेशी अशी खेळी करता आलेली नाही. अनेक वेळा रोहित 10 हून कमी धावा करून तंबूत परतला आहे. 


सलग पाच सामन्यांमध्ये एक अंकी धावसंख्येवर बाद 


गेल्या पाच सामन्यांमध्ये रोहित शर्मा एक अंकी धावसंख्येवर बाद झाला आहे. यासोबतच रोहित शर्माच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्मा त्याच्या कारकिरर्दीत पहिल्यांदा सलग पाच सामन्यांमध्ये एक अंकी धावसंख्येवर बाद झाला आहे. त्याआधीही रोहित आयपीएल 2017 मध्ये सलग चार सामन्यांमध्ये 10 हून कमी धावसंख्येवर बाद झाला होता. आयपीएल 2023 मध्ये रोहितने स्वत:च नकोसा विक्रम मोडला आहे.


रोहित शर्मासाठी धावा काढणं झालं कठीण


रोहित शर्मा गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. रोहितच्या बॅटमधून धावा काढणं कठीण झालं आहे. आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंतच्या 11 सामन्यांमध्ये रोहितनं फक्त 191 धावा केल्या आहेत. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात तो 8 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. तो यंदाच्या आयपीएलच्या सलग पाच डावांमध्ये एक अंकी धावसंख्येवर बाद झाला आहे, ही त्याच्या कारकिर्दीतील पहिलीच वेळ आहे.


आयपीएल 2023 मधील मागील 5 सामन्यांमधील रोहितची धावसंख्या :



  • 2(8) : बंगळुरू विरोधात

  • 0(3) : चेन्नई विरोधात

  • 0(3) : पंजाब विरोधात

  • 3(5) : राजस्थान विरोधात

  • 2(8) : गुजरात विरोधात


आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा एक अंकी धावसंख्येवर बाद


रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सिंगल डिजिटमध्ये बाद करणारा खेळाडू आहे. आयपीएलमध्ये तो 72 वेळा सिंगल डिजिटमध्ये बाद झाला आहे. त्याचवेळी, दिनेश कार्तिक 68 वेळा सिंगल डिजिटवर बाद झाला आहे. रॉबिन उथप्पा 57 वेळा सिंगल डिजिटमध्ये बाद झाला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IPL 2023 : नवीन उल-हकनं पुन्हा एकदा कोहलीला डिवचलं, बंगळुरुच्या पराभवानंतरची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत