MI vs RCB, Match Highlights : सूर्यकुमार आणि नेहालचं झंझावाती अर्धशतक, मुंबईकडून बंगळुरुचा 6 विकेट्सने पराभव
MI vs RCB, Match Highlights: सूर्यकुमार यादवचे वादळी अर्धशतक आणि नेहाल वढेरा आणि इशान किशनच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने आरसीबीचा सहा विकेटने पराभव केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरसीबीने दिलेले 200 धावांचे आव्हान मुंबईने 21 चेंडू आणि सहा विकेट राखून सहज पार केला. सूर्यकुमार यादव आणि नेहाल वढेरा यांनी अर्धशतकी खेळी केली. 3
आरसीबीने दिलेले 200 धावांची आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने वादळी सुरुवात केली. ईशान किशन याने आरसीबीची गोलंदाजी फोडून काढली. इशान किशन याने 42 धावांचा पाऊस पाडलाय.
21 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 42 धावांचा पाऊस पाडला. ईशान किशन याची वादळी खेळीला वानंदु हसरंगा याने संपवली. रोहित शर्मा यालाही हसरंगा याने स्वस्तात तंबूत पाठवले. रोहित शर्मा सात धावांवर तंबूत परतला.
ईशान किशन आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव याने डाव सावरला. नेहाल वढेराच्या साथीने सूर्यकुमार यादवा याने धावांचा पाऊस पाडला. सूर्यकुमार यादव याने आरसीबीच्या गोलंदाजांची कत्तल केली.
सूर्यकुमार यादव याने 35 चेंडूत 83 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये सहा षटकार आणि सात षटकारांचा समावेश होता. सूर्यकुमारच्या फटकेबाजीसमोर आरसीबीची गोलंदाजी दुबळी जाणवत होती. सूर्यकुमार यादव याने नेहाल वढेरा याच्यासोबत 66 चेंडूत 140 धावांचा पाऊस पाडला.
वैशाक विजयकुमार याने सूर्याचा अडथळा दूर केला.. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सामना मुंबईच्या बाजूने झुकला होता. अखेरीस नेहाल वढेरा याने मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. टीम डेविड याला खातेही उघडता आले नाही.
वैशाक विजयकुमार याने त्याला तंबूत धाडले. नेहाल वढेरा याने 34 चेंडूत 52 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि चार चौकार लगावले.
आरसीबीकडून जोश हेलवूड, मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल महागडे ठरले... वानंदु हसरंगा आणि विजयकुमार वैशाक यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.
ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने निर्धारित 20 षटकात 199 धावांपर्यंत मजल मारली. मॅक्सवेल आणि फाफ यांच्याशिवाय तळाला दिनेश कार्तिक यानेही फटकेबाजी केली. जेसन बेहरनड्रॉफ याने तीन विकेट घेतल्या.
विराट कोहली आणि अनुज रावत झटपट बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी ढेपाळते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. पण ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांनी आरसीबीचा डाव सावरला. फाफ याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. तर मॅक्सेवल याने पहिल्यापासूनच वादळी फलंदाजी केली.
मॅक्सवेल आणि फाफ यांनी मुंबईच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. तिसऱ्या विकेटसाठी मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांनी 62 चेंडूत 120 धावांची भागिदारी केली. यामध्ये मॅक्सवेलचे योगदान 68 धावांचे होते. मॅक्सवेल याने 33 चेंडूत 68 धावांच खेळी केली. या खेळीत मॅक्सवेल याने चार षटकार आणि आठ चौकार लगावले.
फाफ डु प्लेसिस याने 41 चेंडूत 65 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने तीन षटकार आणि पाच चौकार लगावले. फाफ डु प्लेसिस याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी करत मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.
मुंबईकडून जेसन बेहरनड्रॉफ याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. जेसन याने पहिल्यापासूनच आक्रमक मारा केला. पावरप्लेमध्ये जेसन याने आरसीबीला दोन धक्के दिले. जेसन हेहरनड्रॉफ याने आरसीबीच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवले.