IPL 2023 Orange and Purple Cap : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप (Orange Cap) आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप (Purple Cap) दिली जाते. यंदाच्या आयपीएल (IPL 2023) हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत फाफ डु प्लेसिस (Faf Du Plesis) आघाडीवर आहे. पण, अनेक युवा खेळाडू त्याला या शर्यतीत मात देण्याची शक्यता आहे. राजस्थानचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याशिवाय गुजरात टायटन्सचा शुभमन गिलही (Shubman Gill) शानदार खेळी करताना दिसत आहे.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत डु प्लेसिसला मागे टाकू शकतात 'हे' युवा खेळाडू

आयपीएल (IPL 2023) मध्ये सध्या ऑरेंज कॅप (Orange Cap) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार फाफ डु प्लेसिसकडे (Faf Du Plesis) आहे. त्याने आतापर्यंतच्या 11 सामन्यांमध्ये 576 धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आहे. जैस्वालने 11 सामन्यांमध्ये 477 धावा केल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) शुभमन गिल (Shubman Gill) असून त्याने आतापर्यंतच्या 11 सामन्यांत 469 धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) डेवॉन कॉनवे (Devon Conway) आणि पाचव्या क्रमांकावर आरसीबीचा (Royal Challengers Bangalore) विराट कोहली (Virat Kohli) आहे. कॉनवेनं आतापर्यंतच्या 11 सामन्यांमध्ये 458 तर विराट कोहलीनं 420 धावा केल्या आहेत.

Oranage Cap : ऑरेंज कॅप

क्र.  टॉप 5 फलंदाज  धावा
1. फाफ डु प्लेसिस  576
2. यशस्वी जैस्वाल 477
3. शुभमन गिल 469
4. डेवॉन कॉनवे 458
5. विराट कोहली 420

IPL 2023 Purple Cap :  पर्पल कॅप

सध्या गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या डोक्यावर पर्पल कॅप आहे. शमीने 11 सामन्यांमध्ये 19 विकेट घेतल्या आहेत. या शर्यतीत आणखी काही गोलंदाज आहेत जे पुढील सामन्यात ही कॅप हिसकावून घेऊ शकतात. राशिद खान आणि तुषार देशपांडे यांनी या मोसमात शमीप्रमाणेच प्रत्येकी 19 विकेट्स घेतल्या आहेत. पण, त्यांचा इकॉनॉमी रेट जास्त आहे. यानंतर पर्पल कॅपच्या शर्यतीत पीयुष चावला, वरुण चक्रवर्ती आणि युझवेंद्र चहल हे खेळाडू फक्त 2-2 विकेट्सने पिछाडीवर आहेत.

क्र.  टॉप 5 गोलंदाज  विकेट
1. मोहम्मद शमी 19
2. राशिद खान 19
3. तुषार देशपांडे 19
4. पीयुष चावला 17
5. युजवेंद्र चहल 17

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IPL 2023 Points Table : दमदार विजयासह मुंबईची प्लेऑफच्या शर्यतीत एंट्री, बंगळुरुसह राजस्थानलाही धक्का; गुणतालिकेतील संघांची स्थिती पाहा