Naveen Ul-Haq Post after RCB Lost, Gautam Gambhir : आयपीएलमध्ये 54 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) दारुण पराभव केला. वानखेडेच्या मैदानावर हा रोमांचक सामना पार पडला. दरम्यान, या सामन्यात आरसीबीच्या पराभवाचा आनंद लखनौ संघाचा खेळाडू नवीन उल-हकला झाल्याचं दिसतंय. नवीनने पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट करत विराट कोहलीला डिवचलं आहे. आरसीबीच्या दारुण पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचा खेळाडू नवीन उल हकनं सोशल मीडियावर पोस्ट करत विराट कोहलीला डिवचलं आहे. 


नवीन उल-हकनं पुन्हा एकदा कोहलीला डिवचलं


इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये 1 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात सामना रंगला. या सामन्यादरम्यान लखनौ संघाकडून खेळणारा अफगाणिस्तानी खेळाडू नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांच्यात मैदानावर वाद झाला. या वादाला आता एक आठवड्याहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही यांच्यातील वाद काही संपताना दिसत नाही. सोशल मीडियावर हा वाद सुरुच असल्याचं दिसत आहे.


बंगळुरुच्या पराभवानंतरची नवीनची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत


मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात आरसीबीचा 6 विकेट्सने पराभव झाल्यानंतर नवीन-उल-हकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली. ही स्टोरी प्रचंड चर्चेत असून वेगाने व्हायरल होत आहे. आरसीबीच्या पराभवावर नवीनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये आंबे गोड आहेत असं लिहिलं. त्याने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, 'राऊंड 2... मी आतापर्यंत खाल्लेले सर्वात गोड आंबे....' 






दरम्यान, याच सामन्यात विराट कोहली एक धावा काढूना बाद झाल्यावरही त्याने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली होती. यामध्ये नवीननं लिहीलं होतं की, 'गोड आंबे'. नवीन उल-हक आणि गौतम गंभीर सोशल मीडियावर पोस्ट करून विराट कोहलीली डिवचण्याचा वारंवार प्रयत्न करत आहेत.






याआधीही नवीन उल-हकने इंस्टाग्रामवर गौतम गंभीरसोबतचा फोटो पोस्ट करत लिहीलं होतं की, 'इतरांसोबत तशीच वागणूक करा, जशी तुम्हाला तुमच्यासाठी अपेक्षित आहे. दुसऱ्यांशी तसंच बोला, जसं बोलणं तुम्हाला अपेक्षित आहे.'






महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Video: 23 वर्षीय नवीन उल हक, केवळ विराटच नव्हे तर आफ्रिदी, परेरा आणि डॉर्सीलाही भिडला!