IPL 2022 Marathi News : ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिल्टल्स समोर गुरुवारी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकात्याचं आव्हान होतं. मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने कोलकात्याचा पराभव केला. या सामन्यात ऋषभ पंतला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. रोमांचक सामन्यात दिल्लीने कोलकात्याचा पराभव केला. हा सामना पाहण्यासाठी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतची प्रेयसी ईशा नेगी आली होती. ईशा नेगीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ईशा नेगी ऋषभ पंतची बहीण साक्षीबरोबर स्टेडिअममध्ये दिसली. 


 ईशा नेगी आणि साक्षी पंत कोलकात्याच्या विकेट पडल्यानंतर जल्लोष करताना दिसल्या. दोघींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.  काही चाहत्यांनी ईशा नेगीला दिल्लीसाठी लक असल्याचे म्हटलेय.


पाहा नेटिझन्स काय म्हणाले - 










दिल्ली कॅपिटल्सने कोलकात्याचा चार विकेटने पराभव केला. कोलकात्याने दिलेले 147 धावांचे आव्हान दिल्लीने सहा गड्यांच्या मोबदल्यात 19 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पार केले. कुलदीप यादव, मुस्तफिजुर रेहमान, डेविड वॉर्नर आणि रॉवमन पॉवेल दिल्लीच्या विजयाचे हिरो राहिले. कोलकात्याचा नऊ सामन्यातील हा सहावा पराभव आहे. तर दिल्लीचा आठ सामन्यातील चौथा विजय आहे. या विजयासाह दिल्लीचा संघ गुणतालिकेत आठ गुणांसह सहाव्या क्रमांकवर पोहचला आहे. तर कोलकात्याचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. कुलदीप यादवने चार विकेट घेतल्या तर मुस्तफिजुर रेहमान याने तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय डेविड वॉर्नर याने 42, रॉवमन पॉवेल याने 33 धावांची खेळी केली. यांच्या कामगिरीच्या जोरावर दिल्लीने विजय नोंदवला. 


हे देखील वाचा-