IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सनरायजर्स हैदराबादच्या संघान चांगली कामगिरी करून दाखवली आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वात हैदराबादच्या संघानं आठ पैकी पाच सामने जिंकले आहेत. तर, तीन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. याचदरम्यान, हैदराबादच्या संघानं त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात हैदराबादच्या संघातील खेळाडू मुलींच्या गेटअपमध्ये दिसले आहेत. मात्र, या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलंय.


दरम्यान, हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू वॉशिन्टन सुंदरनं नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात भुवनेश्वर कुमार आणि वॉशिन्टन सुंदर मुलीच्या गेटअपमध्ये दिसले. या फोटोमुळं नेटकऱ्यांनी हैदराबादच्या खेळाडूंना ट्रोल केलं आहे. 


वॉशिन्टन सुंदरची इन्स्टाग्राम पोस्ट-



आरसीबीविरुद्ध सामन्यापूर्वी हैदराबादच्या संघानं त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओ कर्णधार केन विल्यमसनसह हैदराबादचे सर्व खेळाडू दिसत आहेत. केन विल्यमसनसह सर्व खेळाडू गाणं गातानाही दिसत आहेत. हे गाणं बिली जोएलच्या 'व्ही डोन्ट स्टार्ट द फायर' पासून प्रेरित आहे.


आयपीएलच्या पंधराव्या हंगामात हैदराबादच्या संघाला पहिल्या दोन सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्सकडून पराभव पत्कारावा लागला होता. मात्र, त्यानंतर पुढच्या चार सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जला पराभूत करून जोरदार कमबॅक केलं.