PBKS vs LSG: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 42 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants Vs Panjab Kings) आमने- सामने येणार आहेत. पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात लखनौचे दोन अष्टपैलू खेळाडू विक्रमाला गवसणी घालणार आहेत.
लखनौची यंदाच्या हंगामातील कामगिरी
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात लखनौच्या संघानं आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामने जिंकले आहेत. तर, तीन सामन्यात लखनौला पराभव स्वीकारावा लागलाय. मात्र, या सामन्यावर नजर टाकली तर दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देताना दिसतील. लखनऊचे खेळाडू दीपक हुडा आणि मार्कस स्टॉइनिस यांच्यासाठी हा सामना खास ठरण्याची शक्यता आहे.
मार्कस स्टॉयनिस रचणार इतिहास
लखनौच्या संघानं आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी मार्कस स्टॉयनिसला 9.20 कोटीत ड्राफ्ट केलं होतं. स्टॉयनिस हा अप्रतिम खेळाडू आहे. स्टॉयनिस आयपीएलमध्ये एक विशेष टप्पा गाठण्याच्या जवळ आहे. पंजाबविरुद्ध सामन्यात स्टॉयनिस 1000 धावांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. यासाठी त्याला फक्त 14 धावांची आवश्यकता आहे. स्टॉयनिसनं आतापर्यंत खेळलेल्या 60 सामन्यांमध्ये 986 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं 4 अर्धशतके झळकावली आहेत.
दिपक हुडा नव्या विक्रमाला गवसणी घालणार
भारतीय खेळाडू दीपक हुड्डानं आपली प्रतिभा दाखवली आहे. आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये लखनौनं त्याला 5.75 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. दीपकनं या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या 88 सामन्यांमध्ये 978 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं 5 अर्धशतके झळकावली आहेत. दीपकनं या हंगामात 193 धावा केल्या आहेत. आयपीएलमधील 1000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला फक्त दोन धावांची आवश्यकता आहे.
हे देखील वाचा-
- Danish Kaneria On Shahid Afridi: शाहिद आफ्रिदी कॅरेक्टरलेस! माजी क्रिकेटर दानिश कनेरियाचे गंभीर आरोप, क्रिडाविश्वात खळबळ
- Umran Malik: 500 रुपयांसाठी एक एक मॅच खेळली, आता आयपीएलमध्ये सर्वात घातक गोलंदाजी, लवकरच टीम इंडियात एन्ट्री करणार?
- Andre Russell: शून्यावर बाद झाल्यानंतर आंद्रे रसल नेमका गेला होता तरी कुठे? व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी का भडकले?