Most sixes list in IPL : आयपीएलच्या पंधराव्या हंगामावर गुजरात गुजरात टायटन्सने नाव कोरलेय. रविवारी झालेल्या सामन्यात गुजरातने राजस्थानचा पराभव करत खिताब नावावर केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 130 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल गुजरातने 18.1 षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात विजय साकार केला.  यासह आयपीएलला नवीन विजेता मिळाला.  यंदाच्या हंगामात षटकार आणि चौकारांचा पाऊस पडलाय. मागील पंधरा वर्षात सर्वाधिक षटकारांचा विक्रम झालाय.  
 
कोणत्या हंगामात सर्वात कमी षटकार - 
आपीएलच्या 2022 हंगामात 74 सामने झाले.. या हंगामात  1062 षटकारांचा पाऊस पडलाय. याआधी कोणत्याही हंगामात एक हजारपेक्षा जास्त षटकारांचा पाऊस पडला नव्हता...याआधी आयपीएल 2021 मध्ये 60 सामन्यात 687, आयपीएल 2020 मध्ये 734, आयपीएल 2019 मध्ये 784, आयपीएल 2018 मध्ये 872, आयपीएल 2017 मध्ये 705, आयपीएल 2016 मध्ये 638 आणि आयपीएल 2015 मध्ये 692 षटकार ठोकले गेलेत. आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात म्हणजेच 2009 मध्ये सर्वात कमी षटकार लागलेत.. दुसऱ्या हंगामात 506 षटकार झळकले होते.  


आयपीएलच्या कोणत्या हंगामात किती षटकार?
आयपीएल 2022: 74 सामने, 1062 षटकार
आयपीएल  2021: 60 सामने, 687 षटकार
आयपीएल  2020: 60 सामने, 734 षटकार
आईपीएल 2019: 60 सामने, 784 षटकार
आयपीएल  2018: 60 सामने, 872 षटकार
आयपीएल  2017: 60 सामने, 705 षटकार
आयपीएल  2016: 60 सामने, 638 षटकार
आयपीएल  2015: 60 सामने, 692 षटकार
आयपीएल  2014: 60 सामने, 714 षटकार
आयपीएल  2013: 76 सामने, 672 षटकार
आयपीएल  2012: 76 सामने, 731 षटकार
आयपीएल  2011: 74 सामने, 639 षटकार
आयपीएल 2010: 60 सामने, 585 षटकार
आयपीएल  2009: 59 सामने, 506 षटकार
आयपीएल  2008: 59 सामने, 622 षटकार



हे देखील वाचा-