Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants: आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् लखनौ सुपर जायंट्स भिडणार
RCB vs LSG: आयपीएल 2024 च्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात सामना होणार आहे. बं
बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर फलंदाजांना मोठा फायदा होतो. या खेळपट्टीवर धावा रोखणे गोलंदाजांना कठीण जाते. रात्र होताच फिरकीपटूंना मदत होईल.
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल/दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, निकोलस पूरन (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ.
इम्पॅक्ट प्लेयर- नवीन उल हक.
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
इम्पॅक्ट प्लेयर- विजयकुमार वैशाख.
IPL 2024 चा 15 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. या सामन्याद्वारे दोन्ही संघांना हंगामातील दुसरा विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. लखनौने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत, ज्यात एक पराभव पत्करावा लागला आहे, तर तीन सामने खेळलेल्या बेंगळुरू संघाला 2 पराभव पत्करावा लागला आहे.
पार्श्वभूमी
RCB vs LSG IPL 2024: आयपीएल 2024 च्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात सामना होणार आहे. बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी मैदानावर हा सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता आरसीबी आणि लखनौचा सामना सुरु होईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -